शिंदेंच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू शकत नाही, काय बोलतात त्यांना लक्षात राहत नाही. विदर्भाच्या मुद्द्यावर किती चर्चा झाली? वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही. विदर्भ महाराष्ट्राचा वेगळा भाग नाही, तो महाराष्ट्राचा भाग आहे, कुणीही विदर्भाला वेगळं करू शकत नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेवेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १०६ कोटी रुपये जमा झालेले असताना शेतकऱ्यांना केवळ ७५ हजार रुपयांची मदत दिल्याचा दावा माजी आमदार अंबादास दानवे यांनी केला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. नेमके याचे लाभार्थी कोण आहेत, असा सवाल त्यांनी केला.
वेगळ्या विदर्भाबाबत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधाने केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे. विदर्भ वेगळा होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. आता बाळासाहेबांचे विचार सोडून गेलेल्यांनी यावर आपली भूमिका मांडावी, सरकारनेही याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान ठाकरेंनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना दिले.
अंदमानात आज स्वातंत्र्यवीर सावकरांच्या पुतळाचे अनावरण करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण झाले. यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारही उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत भास्कर जाधव यांच्यासह पक्षाचे अन्य काही आमदारही होते. विरोधी पक्षनेतेपदाबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिकांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असेल तर ते आपल्याला मान्य होणार नाही, असे भाजपने स्पष्ट केले आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी याबाबत मीडियाशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मलिकांबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना बुरशी लागलेली औषधं देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणाची मनसेनं तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय.
राज्यातील शिक्षणव्यवस्थेवर अभूतपूर्व, असा हल्ला होत आहे. मराठी शाळा बंद करण्यापासून ते शिक्षण पूर्णपणे खासगी हातात देण्यापर्यंत सरकारने लोकशाही आणि संविधानावर थेट प्रहार केला आहे. सरकारने शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण करून सर्वसामान्य मुलांच्या भवितव्यावर काळे ढग आणले आहेत. सरकारी शाळा बळकट करण्याऐवजी त्यांना बंद करण्याचे परिपत्रक वारंवार काढले जात आहे. या धोरणांविरोधात AISF महाराष्ट्र ठामपणे उभा आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचवण्यासाठी AISF कडून राज्यव्यापी आंदोलन करीत नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनावर विद्यार्थ्यांचा भव्य एल्गार मोर्चा काढला आहे.
राज्यातील लाडकी बहीण योजनेत तब्बल 165 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची लेखी उत्तरात कबुली दिली आहे. 12 हजार 431 पुरुषांनी 25 कोटी रुपये तर 77 हजार अपात्र महिलांनी 140 कोटी, तर 9526 शासकिय महिला कर्मचाऱ्यांनी 14.50 कोटी रुपये लाटल्याचं आदिती तटकरेंनी माहिती देताना सांगितलं आहे.
मुंबई महापालिकेबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भाजपच्या एका सर्व्हेमध्ये मुस्लिम बहुल भागात भाजपला विरोध होत असून एकनाथ शिंदेंना पसंती मिळत असल्याचं समोर आलं आहे. भाजपच्या या सर्व्हेत मुंबईतील 18 वॉर्डमध्ये 70 टक्के मुस्लिम बहुल भागात भाजपला विरोध होत असला. तरी एकनाथ शिंदेंच्या नावाला पसंती असल्याचे निदर्शनास दिसून आले. या 18 वॉर्डात एकनाथ शिंदेंनी उमेदवार दिला, तर त्याचा फायदा पक्षाला होईल, कारण एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहिणचा प्रभाव हा मुस्लिम महिलांमध्ये आहे
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या जगप्रसिद्ध साई संस्थानच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे. संस्थांन 2024-2025 या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर केला. साईनगरीत गर्दी घटली असली, तरी उत्पन्न मात्र वाढले आहे. शिर्डी साई संस्थानचे वार्षिक उत्पन्न 850 कोटींवर गेले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत 31.62 कोटींची वाढ झाली आहे. साई संस्थानच्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जवळपास 3200 कोटींच्या ठेवी आहेत. शिर्डीचं साई संस्थानचे देवस्थान पुन्हा श्रीमंत देवस्थानांच्या यादीत आलं आहे.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना वडिलांच्या स्मृतींना उजाळा दिला. वडिलांच्या आठवणी सांगताना त्या काहीशा भावूक झाल्याचे दिसून आले. "आज मुंडे साहेब हवे होते. मुंडे साहेबांच्या खूप आठवणी आहेत," असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. "मुंडे साहेबांनी आम्हाला खूप आदर केला." त्यांनी एक खास आठवण सांगितली, "माझ्या मुलाला जेंव्हा जन्म दिला, तेव्हा सर्व बाळाकडे (नातवाकडे) गेले; पण बाबांनी (मुंडे साहेब) माझ्याकडे येऊन माझी चौकशी केली," अशीही आठवण पंकजा मुंडेंनी सांगितली.
पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक जवळपास दहाहून अधिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पदस्पर्श दर्शन आणि मुखदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची दैनंदिन संख्या मोजणे तसेच गर्दी व्यवस्थापन सुकर करण्यासाठी या कॅमेऱ्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.
मराठवाड्यात मराठा बांधवाना गेल्या तीन केवळ 98 अर्जदारांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं आहे. प्रशासनात यात मोठी अनास्था आहे. त्यामुळे गाव पातळीवर लवकर समितीत्या स्थापन करावेत, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला अहवाल प्राप्त आहे की, बहुतांशी समित्या स्थापन झाल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी पुढील हेल्पलाईन सुरू करत आहोत, असे सांगितले.
राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मायक्रोसॉफ्टकडून मुंबईत मोठी गुंतवणूक करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल होत आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मुंबईतील वाय.बी.सेंटरमध्ये गर्दी केली आहे,
मुंबई पोलीस दलातील शिपाई आणि उपनिरीक्षकांना आता किमान ५३८ चौरस फुटांची सदनिका सेवानिवासस्थान म्हणून मिळणार आहे. याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पाठविलेला प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला आहे.याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एका उमेदवारने सात ते आठ कोटी वाटल्याची जाहीर कबुली दिली आहे. त्या उमेदवाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरातील हा प्रकार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात न्यायालयाने काढलेले समन्स रद्द करण्याते आले आहे, सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही, तर गावाचे पाणी बंद करू," अशी कथित धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात समन्स काढण्यात आले होते. बारामती सत्र न्यायालयाने हे समन्स रद्द केले आहे.
गुंतवणूकदारांची भिशी वेळेत न देता आल्याने भाजप जिल्हा उपाध्यक्षाच राजू मोरे आत्महत्याचा प्रयत्न केला आहे. गुंतवणूकदारांनी तगादा लावल्याने विष घेतले. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भिशी फुटण्याच्या दिवशीच आत्महत्याचा प्रयत्न केल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले.गेल्या अनेक दिवसांपासून टोलवाटोलवी करत असल्याने गुंतवणूकदारांनी आपला गोंधळ घातला होते.
पुणे महापालिका निवडणुकीच्या मैदानत उतरली आहे. महाविकास आघाडीसोबत जायचे की नाही याचा निर्णयाची वाट न पाहता मनसेने मोर्चेबांधणी सुरू केली असून आजपासून फॉर्म वाटप केले आहे. शुक्रवारी आणि शनिवारी दुपारी ४ ते ७ या वेळात उमेदवारी अर्ज वाटपाची प्रक्रिया होणार आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.