पुणे रेल्वे स्टेशनवरील बंद सीसीटीव्ही आणि सुरक्षेतील त्रुटींवरून मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे सरकारच्या अधिकाऱ्यांवर टीका केली. त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त करत स्टेशनवरील सुरक्षेची ढिलाई धोकादायक असल्याचे सांगितले. हजारो प्रवासी येत असताना सुरक्षेचा अभाव असल्याचा आरोपही केला.
पुणे-पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने पीएम-ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) तब्बल 1000 नव्या इलेक्ट्रिक बस खरेदीस मंजुरी दिली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब केले असून, लवकरच या बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
ठाकरे सेनेचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. देवगिरी नागरी सहकारी बँकेची ५.३३ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. उमंग व्हाईट गोल्ड प्रा. लि. कंपनीच्या कर्जावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- डॉ. मुझम्मिल आणि डॉ. उमर यांनी लाल किल्ल्याची रेकी केली.
- जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लाल किल्ल्याची रेकी केली.
- २६ जानेवारी रोजी लाल किल्ल्याला लक्ष्य करणे हा त्याच्या नियोजनाचा एक भाग होता.
- दिवाळीत गर्दीच्या ठिकाणी घातपात करण्याचा कट होता.
- डॉ. मुझम्मिलच्या फोनच्या डंप डेटावरून मिळाली माहिती.
तुळजापूरातील ड्रग्स प्रकरणातील आरोपींना भाजपात प्रवेश देण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. तुळजापूरातील या पक्षप्रवेशासंबंधात तातडीने कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. काल अनेक जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात शहरातील ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपींचा समावेश असल्याकडे सुळे यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे. हे पक्षप्रवेश जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले, याचे आश्चर्य वाटले. ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय, असे सुळे यांनी पत्रात म्हटलं आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडणूक मंडळाची महत्वाची बैठक आज दादर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, ज्येष्ठ नेते, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अमित देशमुख, विश्वजित कदम यांच्यासह निवड मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
पुण्यातील जमीन व्यवहारप्रकरणी पार्थ पवार यांना माहिती होती, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद सांगितले. यावरुन अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
मनोज जरांगे यांच्या घातपाताचा कट रचल्याच्या प्रकरणी कांचन साळवी नावाच्या आरोपीला अटक केली आहे. दादा गरड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन नावाच्या व्यक्तीचा सबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडेंचा PA असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यानंतर आता कांचन साळवीला जालना पोलिसांनी अटक केली आहे.
सांगलीत दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची त्यांच्या वाढदिवशीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या करण्यासाठी आलेल्या शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख याच्यावरही जमावाने हल्ला केल्याने त्याचाही मृत्यू झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. पण, विधानसभेला गडबड झाली, ‘दाल में कुछ काला है, असाच विधानसभेचा निकाल लागल्याचा आरोप काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवल्यानंतर रूपाली ठोंबरे पाटील आज अजित पवारांच्या भेटीसाठी आल्या होत्या. मात्र, पक्ष कार्यालयात अजित पवार आले नसल्याने त्यांनी आता भेट न झाल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे. 2022 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला मूळ पक्ष आणि चिन्ह देण्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने आव्हान दिले आहे. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि निवडणूक धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यावर सुनावणी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.