Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update: मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर

Local Body Elections 2025 Live Updates: दिल्ली कार ब्लास्ट प्रकरण दहशतवादी हल्ला म्हणून घोषीत. अनेक संशयीतांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यासह आजच्या 13 नोव्हेंबर रोजीच्या राज्यातील आणि देशातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर

नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजित विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यात रामकुंड पंचवटी, नाशिक येथे रामकाल पथ पाहणी, जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे उदघाटन आणि कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा मुख्य सोहळा ठक्कर मैदान, त्र्यंबक रोड, नाशिक येथे होणार आहे.

काँग्रसचे वंचितसोबत युतीचे संकेत

वंचित बहुजन आघाडी सोबत स्थानिक पातळीवर युती करण्याचे संकेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. ते म्हणाले. काही ठिकाणी आम्ही वंचितसोबत युती करत आहोत. काही ठिकाणी बसपाला सोबत घेत आहोत.

ट्रम्पेट वगळले, रोहित पवारांनी मानले निवडणूक आयोगाचे आभार

निवडणूक चिन्हातून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळल्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले. ते म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पिपाणीचा खूप मोठा फटका आम्हाला सहन करावा लागला. हाच निर्णय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत घेतला असता तर आजचं चित्र खूप वेगळं असतं...! पण असो! देर आए दुरुस्त आए..!

महायुतीमधील कोणत्याही पक्षासोबत युती नाही - विजय वडेट्टीवार

राज्यात नगरपरिषद, नगरपालिका निवडणुका होत आहेत. याबाबत तिकीट, उमेदवार अंतिम करण्यासाठी बैठक झाली. राज्यात महायुती मधील कोणत्याही घटक पक्षाशी आम्ही युती करणार नाही. काही जिल्ह्यात वंचित बरोबर देखील आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. बीएसपी बरोबर देखील जाण्याची तयारी आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढू, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

एमसीएच्या उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

मुंबई क्रिकेट संघटनेच्या उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड विजयी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी अजिंक्य नाईक यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती, शरद पवार-अशिष शेलार गटाने या निवडणुकीसाठी युती केली होती.

शेतीच्या प्रश्नामुळे मुली भेटत नाहीत - अनिल देशमुख

लग्न जुळवून द्या, असे पत्र एका तरुणाने शरद पवारांनी दिले आहे. त्याबाबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले, अनेक गावांमध्ये तरुण राहतात. बेरोजगारी असल्याने मुलींना शहरातील नवरा पाहिजे, असे मानसिकता आहे. ही सामाजिक समस्या आहे.

निवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्न

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवाराच्या निवडणूक खर्चाच्या जिल्हा दरसूचीच्या दर निश्चितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. याबैठकीत विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत निवडणूक खर्चाच्या वापरण्यात आलेली दरसूची जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकात वापरण्यास सहमती दर्शविण्यात आली.

Pune News: पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून 2 तरुणींवर अत्याचार

पुण्यातून तीन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. लग्नाचं आमिष दाखवून दोन तरुणी आणि एका महिलेवर बलात्कार केल्याची प्रकरणं उघडकीस आली आहेत. कोंढवा, हडपसर आणि सहकारनगर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी केवळ सहा अर्ज दाखल

जळगाव पालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत बुधवारी तिसऱ्या दिवशी सहा अर्ज दाखल झाले आहेत. ऑनलाइन ११५ अर्ज आले आहेत. अमळनेरला पाच तर पाचोरा येथे एक अर्ज असे एकूण सहा अर्ज ऑफलाइन दाखल झाले आहेत. मंगळवारपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी वरणगाव येथे एक अर्ज दाखल झाला. तर नगरसेवक पदासाठी भुसावळ, अमळनेर, पाचोरा येथे प्रत्येक एक अर्ज दाखल झाले होते.

दिल्ली स्फोटात दहशतवादी डॉक्टर उमरचा मृत्यू

दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉक्टर उमरचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. कारमध्ये स्फोट झाला तेव्हा उमर त्याच कारमध्ये होता असे तपासात स्पष्ट झाले आहे. डीएनए चाचणीमधून उमरच्या मृतदेहाची ओळख पटली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती आज पक्षाचे अध्यक्ष अजित पवार घेणार आहेत. त्यासाठी ते बारामतीत दाखल झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT