विधानपरिषदेच्या शेवटच्या दिवशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील राजकीय वर्चस्वावर भाष्य केलं. मुंबईत निवडणुका आल्या की सर्वे सुरू होतात, चर्चा रंगतात; मात्र मुंबईला कोणीही तोडू शकत नाही, असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाला टोला लगावला.
Nagpur news : नागपूर येथील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा रविवारी शेवटचा दिवस होता. त्यानंतर महाविकास आघाडी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारच्या कारभारावर टीका केली. हिवाळी अधिवेशनात विदर्भाचे प्रश्नच सुटले नाहीत, अशी टीका काँग्रेसचे नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन सुधारणा विधेयक 2025 विधानसभेत आणि विधानपरिषदेत मंजूर झाले. हे विधेयक प्रथमच राज्यात राष्ट्रीय महत्वाचा बाजार, युनिफाईड सिंगल ट्रेडिंग लायसन्स आणि राष्ट्रीय कृषी बाजार या शेतकरी हिताच्या संकल्पना कायदेशीर रूप दिले आहे. हे विधेयक पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दोन्ही सभागृहात मांडले आणि ते मंजूर झाले.
'महाराष्ट्राचं व्हिजन डॉक्युमेटं तयार केले आहे. त्यामध्ये 2047 चा विकसित महाराष्ट्र कसा असेल याचा रोडमॅप आपण तयार केला आहे. 2030 चा पहिला टप्पा, 2035 चा दुसरा टप्पा आणि 2047 चा तिसरा टप्पा आहे. मला विश्वास आहे की, 2029 ते 2030 दरम्यान महाराष्ट्र हा देशातील पहिली एक ट्रिलिनय डॉलर्सची अर्थव्यवस्था असेल,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
संगमनेरमधील जवळे कडलग इथला बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलं आहे. बिबट्याच्या हल्ल्यात सिद्धेश कडलग या चिमुरड्याचा काल मृत्यू झाला होता. आढळा नदीकाठच्या गवात लपलेल्या बिबट्याला बेशुद्ध करत पकडण्यात आलं. बिबट्याला पकडण्यासाठी चार पथकं होती.
राज्य सरकारच्या विविध विभागामध्ये 2,99,051 इतकी पदे रिक्त असून, एकूण 8,18,503 पदांपैकी 36.54 टक्के इतकी पदे रिक्त आहेत. ऑगस्ट 2022 ते नोव्हेंबर 2025 या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारी, निमसरकारी आणि अनुकंपा तत्त्वावर एकूण 1,20,232 नियुक्त्या केल्या आहेत. नवीन पद निर्मितीमुळे अथवा सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदे होत असून सरळ सेवा मार्गाद्वारे प्रशासकीय पद भरली जात असल्याची विधानसभेत तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांच लेखी उत्तर दिलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपुरात आज बौद्धिकाचे आयोजन केलं. या बौद्धिकाला महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांना आमंत्रित केलं. समाधीस्थाळाचे दर्शन घेतल्यानंतर आमदार आणि मंत्र्यासाठी महर्षी व्यास सभागृहाच्या तळमजल्यावर अल्पोपहार आयोजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी एकत्र येत सोबत कॉफी घेतली. यावेळी दोघांमध्ये बराच वेळ चर्चा देखील झाल्याची माहिती आहे.
माढा तालुक्यातील टेंभुर्णीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेते भारत पाटील यांच्या अंगावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाचे ऑईल ओतून त्यांना आंघोळ घातली. दोन दिवसांपूर्वी त्यांनी वाळू माफियांनी वकिलाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप मराठा क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. यातूनच या कार्यकर्त्यांनी भारत पाटील यांच्या अंगावर काळे ऑइल ओतल्याचा प्रकार घडला आहे.
अमरावती महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे पदाधिकारी समीर जवंजाळ यांनी केला. अमरावती महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 राजापेठ शंकर नगरमध्ये सारंग राऊत यांच्या पत्त्यावर तब्बल 200 मतदारांची नावे आहेत. मात्र प्रत्यक्षात सारंग राऊत या घरी राहतच नाही, त्यांचं घर कुलूप बंद आहे. अमरावती महापालिकेचा पडताळणीमध्ये स्पष्ट झालं आहे, सारंग राऊत हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, असा आरोप देखील काँग्रेस पक्षाने केला.
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग इथं बिबटयाच्या हल्ल्यात सिद्धेश कडलग या चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. काल रात्रीपासून वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. बिबट्याला ठार मारल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेतली. तसंच ग्रामस्थही या मागणीवर आक्रमक झाले. वनविभागाच्या कारवाईकडे लक्ष लागले असतानाच, अखेर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश काढले आहे.
नांदेड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. या मुलाखती प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेक इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली आहे. दरम्यान, युतीचा कोणताही प्रस्ताव आला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड महानगरपालिका निवडणूक लढवणार आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्रासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात असून येत्या काळात तुळजापूरचा कायापालट होणार आहे. माञ काही विरोधकांकडून एकञ येत षडयंत्र रचून तुळजापूरची बदनामी सुरू आहे. तुळजापूर ड्रग्स प्रकरणी काही माहिती आपल्याला मिळाल्यानंतर पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. माञ या प्रकरणाचा आधार घेवून जाणीवपूर्वक तुळजापूरची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या प्रकरणी उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी करावी, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली.
कल्याण डोंबिवलीमध्ये लावलेल्या बॅनरवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा फोटो आणि त्यावर लावण्यात असलेल्या मजकुराने शिंदेंना डिवचल्याची चर्चा आहे. या बॅनरवर ''इस बार जवाब ही ऐसा देंगे, फिर कभी सवाल ही नही उठेगा...'' असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
राज्यात आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजप- एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची युती होणार हे निश्चित झाली आहे. मात्र. या युतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान मिळणार नल्याची चर्चा आहे. भाजपच्या काही प्रभावी नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत न घेण्याचा आग्रह धरल्याची माहिती आहे.
केंद्र सरकारच्या परराष्ट्रनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “विश्वास ठेवायचा तर मी लष्कर प्रमुखांवरच ठेवेन, धर्माधारित राजकारणामुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरची मित्रता कमी होत आहे.
नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाला भेट दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी संघाच्या कार्याचं कौतुक केलं. 'नागपूर ही केवळ राज्याची उपराजधानी नसून संघाची जन्मभूमी आहे. तसंच, शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची विचारधारा एकच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. संघाच्या शताब्दी वर्षाचा उल्लेख करत, त्यांनी स्वयंसेवकांच्या निरपेक्ष सेवेचा गौरव केला. रेशीमबाग येथे आल्यावर नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
आरोपीचा समर्थन करणारी टोळी सक्रिय झाली असून वारंवार सोशल मीडियावर बोलताना आरोपीची आठवण येत आहे. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे.
बुलढाण्यातील 7 आगारांसाठी विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांकडून 150 EV एसटी बसची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात या आठवड्यात 12 बस दाखल होणार आहेत, तर काही दिवसात उर्वरित बस देखील टप्प्या टप्प्याने आणल्या जाणार आहेत.
शिक्षण विभागाने श्रीमती मनरादेवी एज्युकेशन संस्था आझादवाडी, दामू नगर, कांदिवली पूर्व मुंबई, तर हनुमंत विद्यामंदिर शाळा कावरपाडा सातीवली पूर्व केंद्र, वालीव तालुका वसई, जिल्हा पालघर इंग्रजी माध्यम आणि हिंदी माध्यम या दोन शाळांची मान्यता रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. मोफत शिक्षण कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे या शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
विधानसभेतील अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे पाप महायुती सरकारचे आहे, असं म्हणत वडेट्टीवार यांनी शेतकरी आत्महत्या, कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिला व बालकांवरील वाढते अत्याचार आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली.
महाराष्ट्र सरकारने मुख्यतः देवेंद्र फडणवीस यांनी मोठेपणा दाखवत विरोधी पक्षाला स्थान दिले पाहिजे. विरोधी नेते पदाला एक पद मिळते त्यांना कॅबिनेटच्या दर्जा मिळतो. त्यांना एक कार्यालय मिळतो, मात्र ते देण्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्ष असेल किंवा सभापती असेल यांच्या मागे त्यांनी लपू नये हा सर्व अधिकार त्यांचा आहे. त्यामुळे त्यांनी बाकी काही नाटक करू नका तुम्हाला जर करायचे असेल तर लगेच करून टाका किंवा नसेल करायचे तर तसे सांगून टाका, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या गाडीवर रात्री अज्ञातांनी गडफेक केल्याचं समोर आलं आहे. दोन महिन्यांपूर्वी पवन करवर याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाची माहिती घेण्याकरता ससाणे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आले होते. त्यानंतरते धारूरकडे जात असताना त्यांच्या गाडीवर दगड फेक करत हल्ला करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीला फाशी दिली. हे अधिवेशन म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.