धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांना अडवून लुटणाऱ्या टोळीला बीड पोलिसांनी अगदी सिनेस्टाईल पद्धतीने अटक केली आहे. बीड आणि धाराशिव पोलिसांनी संयुक्तिक कारवाई करत धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडी गावात ड्रोनच्या माध्यमातून गुन्हेगारी वस्तीवर छापा टाकला. ड्रोन कॅमेरा द्वारे रेकी करून शंभर पोलिसांनी गावाला चारही बाजूने घेेरा टाकत चोरट्यांना अटक केलीये.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे लढतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले. यानंतर ताकदवान उमेदवारांना आपल्याकडे असावेत यासाठी दोन्ही पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच अजित पवारांनी 2 दिवसांपासून पिंपरी चिंचवडमध्ये पक्ष प्रवेशाचा धडाका लावला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक राहुल कलाटे यांचीही पक्ष प्रवेशासाठी मनधरणी केल्याची चर्चा होती. मात्र कलाटेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका केल्याने त्यांनी राजकीय मार्ग निश्चित केल्याचे बोलले जाते.
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गट आणि भाजपमध्ये अपक्ष माजी नगरसेवक अरुण गीध यांच्या पक्षप्रवेशावरून जुंपली आहे. अशातच, अरुण गीध यांनी भाजपवर केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी माझ्या कार्यालयाशेजारीच भाजपचे कार्यालय असल्याने मी तिथे सहज गेलो होतो, मात्र तेथे कार्यालयाचे दार बंद करून माझ्या गळ्यात भाजपचा पट्टा टाकण्यात आला, असे म्हटलं आहे.
आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अजित पवार गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महायुतीत सन्मानजनक जागावाटप न झाल्यास सर्व १३१ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी पक्षाने दर्शवली असून, आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ३५ नगरसेवक निवडून आले होते. तोच आधार घेत यंदाही किमान ३५ जागांची मागणी केली जाणार आहे.
सर्वसामान्यांना कायद्याचा बडगा दाखवणाऱ्या रेल्वे प्रशासनानं स्वत:चं पाप झाकून ठेवण्याचा प्रकार वांगणीत समोर आलाय. याठिकाणी रेल्वेनं अंडरपासचं काम सुरू केलंय मात्र त्यासाठी वनविभागाची आवश्यक ती परवानगीच घेतलेली नाही. महत्वाचं म्हणजे एका ठिकाणी सुरू असलेलं काम अचानकपणे बंद करून ते दुसऱ्या जागी सुरू केल्यामुळे यामागचं नेमकं गौडबंगाल काय? असा सवालही उपस्थित केला जातोय.
मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युतीचा निर्णय आता स्थानिक नेत्यांऐवजी वरिष्ठ पातळीवरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागावाटपावरून दोन्ही पक्षांत मोठा पेच निर्माण झाला आहे
महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून राज्यातील सर्वच पक्ष आता तयारी लागले आहेत. नागपुरात देखील भाजप मोर्चे बांधणी करताना दिसत असून उमेदावारीसाठी जोरदार रस्सी खेच समोर येत आहे. अशातच येथे मोठा राजकीय भूकंप झाला असून बहुजन रिपब्लकनचे उरले-सुरले नगरसेवकही भाजपकडे गेले आहेत. यामुळे बहुजन रिपब्लकन एकता मंचच्या नेत्या माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांना धक्का बसल्याचे बोलले जात आहे. तर जागा वाटपावरून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या वादाचा हा फटका असल्याचेही येथे चर्चा आहे.
वंचित बहुजन आघाडीची कोल्हापुरात भव्य विजयी संकल्प महासभा महानगरपालिका निवडणूक जाहीर होताच राज्यातली पहिली सभा कोल्हापुरात कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर सभेला करणार संबोधित करणार आहेत. यातून कोल्हापूर महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची दिशा स्पष्ट होणार आहे.
महायुती करायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15 टक्के म्हणजेच 22 जागा नागपूर महानगरपालिकेत द्याव्यात, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवली जाईल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र जैन यांनी दिला आहे. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची कोअर कमिटी बैठक आज नागपुरात पार पडली. या बैठकीत नागपूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील जागावाटपावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळं चर्चांना भलतच उधाण आहे.
महापालिका निवडणुकांमध्ये आघाडीबाबत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत बोलणी झाल्याचे समोर आले आहे. आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला झटका बसला आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद हायकोर्टाने कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून तुरूंगात असलेल्या कराडचा बाहेर येण्याचा मार्ग बंद झाला आहे.
सदनिका गैरव्यवहार प्रकरणात मंत्री माणिकराव कोकाटे यांना मुंबई हायकोर्टातही झटका बसला आहे. गैरव्यवहार प्रकरणात झालेल्या शिक्षेला जिल्हा सत्र न्यायालयाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर आज कोकाटेंविरोधात अटक वॉरंटही जारी केले आहे. त्याला कोकाटेंनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. मात्र, कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यांच्या याचिकेवर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोकाटेंच्या अटकेची शक्यता वाढली आहे.
मनसेमुळे ठाकरेसेना संकुचित झाली आहे. ठाकरेसेनेला अमराठी मते मिळणार नाहीत, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असताना आंबेडकरांनी हे वक्तव्य केले आहे.
माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. अटक टाळण्यासाठी कोकाटेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे माहिती समोर आली आहे.
राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? कायद्यानुसार लोकसभेत राहुल गांधींची आणि महाराष्ट्रात सुनिल केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मग कोकाटेंना वेगळा न्याय का? की कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत? गल्लीतील भांडणांची दखल घेऊन विधिमंडळात तात्काळ निर्णय घेतले जातात मात्र आज जेव्हा निर्णय घेणे गरजेचे आहे तेव्हा विलंब का केला जातोय ? माननीय विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखत तात्काळ माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द करून आदर्श प्रस्थापित करावा...!
क्रीडामंत्री माणिकराव कोकोटे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती अटळ मानली जात आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नव्या मंत्र्याच्या नियुक्तीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज्यातील सत्ताकारण वेगाने बदलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत फडणवीसांनी अजित पवार यांना थेट प्रश्न विचारल्याची चर्चा असून, या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदनिका गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेले माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वारंट निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. अटक टाळण्यासाठी कोकोटेे हे उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची तयार कायम आहे. त्यांना कधीही अटक होऊ शकते. दरम्यान अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले आहेत.
काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. प्रज्ञा सावत काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
ठाकरे सेना -मनसे यांच्यातील युतीबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, लवकरच जागा वाटप केले जाईल, असे ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितले.
अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक दोन दिवसांवर आली असताना भाजपाचे उमेदवार पवन वाळकेर यांच्या कार्यालवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे , बुधवारी रात्री एक वाजताच्या सुमारास पवन वाळेकर हे अंबरनाथ पश्चिमेकडील नवीन भेंडी पाडा येथील आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांसह बसले होते ,त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी पवन वाळेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने चार राउंड फायर केले, या चार गोळ्या कार्यालयाच्या काचेवर लागल्या . ही गोळीबारची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, गोळीबार नंतर हे इसम तिथून पळून गेले. धमकवण्याच्या दृष्टीने हा गोळीबार केला असल्याचा पोलिसांचं म्हणणं आहे , घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत ,आज अंबरनाथ मध्ये मुख्यमंत्र्यांची सभा असून त्या पार्श्वभूमीवर हा गोळीबार झाला आहे , या घटनेने निवडणुकीला गालबोट लागला आहे,
पुणे महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 25 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आप या निवडणुकीत कोणाशीही युती अथवा आघाडी करणार नाही. स्वबळावर ही निवडणूक आप लढणार असल्याचे आपचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी जाहीर केले आहे.
मुरुडमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये युती झाल्याचे बॅनर अंबादास दानवे यांनी ट्विटरवर शेअर करत शिंदेंवर टीका केली आहे. ते म्हणाले, धारशिवच्या उमरगा नंतर सादर आहे शिंदे-काँग्रेस युतीचे नवे पर्व, 'द मुरुड फाईल्स'. शिंदेंची अंतुलेना साथ.. बाण-पंजा एक साथ.. यंदा 'बाळासाहेबांचे विचार' खुंटीऐवजी थेट समुद्रात का मग, असा सवाल देखील त्यांनी शिंदेंना विचारला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 50 जागांवर लढण्याचा प्रस्ताव दिला जाणार असल्याचा माहिती आहे. 227 जागांपैकी शिंदेंना केवळ 50 जागांची ऑफर दिल्याने महायुतीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अंबरनाथमध्ये मध्यरात्री भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. नवीन भेंडीभाडा परिसरात प्रभाग क्रमांक चारमधील भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर अज्ञात इसमांनी गोळीबार केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.