अंबरनाथमध्ये निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कोणत्या पक्षाचे कोणते चिन्ह आहे हे स्पष्ट व्हावे म्हणून नगरपालिकेच्या बाहेर एक विशेष माहिती फलक उभारण्यात आला आहे. मात्र या फलकावरील निवडणूक चिन्हाखाली पक्षाचं नावं लिहिले नसल्याचं समोर आलं आहे. राज्यस्तरीय पक्षांच्या चिन्हांखालीही पक्षाचं नावं दिलेलं नाहीत...
नवी मुंबईतील मिलेनियम बिझनेस पार्कमधील बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. तब्बल 12 तास चाललेल्या या कारवाईत 17 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. विशेषतः अमेरिका आणि युरोपमधील नागरिकांना टार्गेट करून शेअर मार्केटमध्ये अपार नफा मिळेल असा खोटा दिखावा करत होते.
बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आज नितीश सरकारच्या मंत्र्यांना शपथ दिली. जमा खान, संजय सिंह टाइगर, अरुण प्रसाद, रमा देवी आणि नारायण प्रसाद यांनी मंत्र्यांना शपथ दिली.
सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा- यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, पाटण्याच्या गांधी मैदानात हा शपथविधी सोहळा सुरु आहे.
नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, ते दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशातील भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत.
बिहारचे मुख्यमंत्रीपदी आज नितीश कुमार विराजमान होणार आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी नरेंद्र मोदी दाखल झाले आहेत. अमित शाह, आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डादेखील उपस्थित आहेत
मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी शीतल तेजवानीची आज पुन्हा चौकशी होणार आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शीतल तेजवानीचा जबाब नोंदवला आहे. मंगळवारी तेजवानीचा प्राथमिक जबाब नोंदवण्यात आला आहे. शीतल तेजवानीला अटक का केली नाही असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
नितीश कुमार यांच्यासोबत आज २५ मंत्री शपथ घेणार आहेत. सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा हे उपमुख्यमंत्रीपदाची शपत घेणार आहे. भाजपचे १२ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. तर जेडीयूचे ७ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील नितीश कुमार सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. ते या सोहळ्यासाठी पाटण्याला रवाना झाले आहेत.बिहार निवडणुकीत आदित्यनाथ यांनी ३१ सभा घेतल्या होत्या.
पुण्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. नवले पूल परिसरात होणाऱ्या अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात, याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील संगणक प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका रूपाली थळे, त्यांचे पती विजय थळे आणि त्यांच्या नातेवाईकांवर दिलीप भोईर आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप होता. या प्रकरणी आता रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर यांच्यासह एकूण 21 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
सांगली जिह्यातील खानापूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या शौर्य प्रदीप पाटील या दहावीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याने दिल्लीतील मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
नितीश कुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ते दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पाटणा येथील गांधी मैदानात शपथविधी पार पडेल. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा उपस्थित राहणार आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी त्यांचे बंधू तथा भाजप नेते नितेश राणेंना उद्देशून जर आपलेच आहेत तर समोर का? ते आपल्या बरोबर असले पाहिजेत, असा सवाल केला आहे. शिवाय आगामी निवडणुकीसाठी आपण आता विकासात्मक चर्चा केली पाहिजे, शहर विकास आघाडीवर टीका टिप्पणी होईल, आरोप केले जातील. पैशांचा वापर केला जाईल. मात्र आपण गुलाल उधळायचा, असं वक्तव्य केलं आहे.
राज्यात बिबट्यांच्या हल्यात अनेक लोकांचे जीव जात आहेत. त्यामुळे बिबट्यांची संख्या रोकण्यासाठी त्वरित त्यांची नसबंदी करावी आणि सरकारने बिबट्यांची नसबंदी केली नाही तर सरकारची नसबंदी होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
मुलुंड पूर्वेकडे नवीन कबुतरखाना सुरू करण्याच्या महापालिकेच्या निर्णयविरोधात मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. जुन्या ऐरोली-मुलुंड चेक नाका परिसरात खाडीजवळ कबुतरखाना सुरू केल्यास येथे येणाऱ्या फ्लेमिंगोंना त्याचा धोका होऊ शकतो असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.