Maharashtra Political Live updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Updates : मिटकरी हे तडजोड करणारे विदुषी आणि फुटकळ नेते - प्रशांत जगताप

Sarkarnama breaking Updates : पुण्यातील काही आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी यांचा आज भाजपच्या मुंबई कार्यालयात पक्षप्रवेश होणार, यासह आज गुरूवार 25 डिसेंबर 2025 रोजीच्या विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

Nashik BJP: पांडे, वाघ यांच्या भाजप प्रवेशावरुन देवयानी फरांदे नाराज

नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी नाराज व्यक्त केली आहे. फरांदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत नाराजी व्यक्त केली आहे.

Shivsena live: 'मातोश्री' परिसरात पुन्हा ड्रोनच्या घिरट्या

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'परिसरात ड्रोन घिरट्या घालताना आढळला. याबाबत पोलिसांनी माहिती देण्यात आली आहे. पोलिस घटना स्थळी पोहचले आहेत. आजुबाजूच्या परिसरात एका प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी हे ड्रोन उडविल्याची माहिती मिळाली आहे.

Jalgaon Live: जळगावात भाजप-शिंदे सेनेची युती

जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप व शिंदे सेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. बैठकीत जागांचा फॉर्म्युला ठरला नसल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत चर्चा करून त्यांना देखील सोबत घेणार असल्याचे माहिती आहे. राष्ट्रवादी सोबत चर्चानंतर महायुती तसेच अंतिम उमेदवारांची यादी निश्चित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

स्वत:चा पक्ष काढ म्हणणाऱ्या अमोल मिटकरींची प्रशांत जगतापांनी लायकीच काढली

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार याबाबत जवळपास निर्णय निश्चित झाल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय शरद पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घेतला आहे. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जगतापावर सडकून टीका केली होती. या टीकेला प्रशांत जगताप यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे, 'मी विचारधारा मान्य करून लोकांच्या मतांवर निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे. अमोल मिटकरी यांच्यासारख्या विदूषक आणि फुटकळ आमदाराच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही. ज्यांची ग्रामपंचायत ही निवडून येण्याची लायकी नाही त्यांच्यावर मी काय बोलावं? अमोल मिटकरी हे तडजोड करणारे विदुषी आणि फुटकळ नेते आहेत. जे लोकांतून निवडून आलेले असतील त्यांनी माझ्याशी बोलावं', असं म्हणत प्रशांत जगताप यांनी प्रत्युत्तर दिलं.

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावरून आजपासून पॅसेंजर सुविधा सुरू होणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून (25 डिसेंबर) पॅसेंजर सुविधा सुरू होणार आहे. दिवसभरात एकूण 30 विमानांची येजा होणार असून 4 हजार प्रवाशी याचा लाभ घेणार आहेत.

मनसेचे पदाधिकारी हरिश हेडा यांचा वाहन अपघातात जागीच मृत्यू

नगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर 'विझलो जरी मी, हा माझा अंत नाही...' अशी पोस्ट लिहिणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचा दुसऱ्याच दिवशी अपघाती मृत्यू झाला. कारंजा शहरातील मनसेचे पदाधिकारी हरिश हेडा यांच्या दुचाकीला एका भरधाव पिक-अप वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Mumbai–Ahmedabad Bullet Train : महापालिकेने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशनचं काम बंद पाडलं

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील स्टेशनच्या बांधकामात वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबई महापालिकेने संबंधित काम तात्काळ बंद करण्याची नोटीस बजावत थांबवलं आहे.

 तुळजाभवानी मातेचे महाद्वार 31 डिसेंबर पर्यंत भाविकांसाठी बंद

नाताळ सुट्यांच्या पाश्र्वभूमीवर 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सामान्य भाविकांसाठी तुळजाभवानी मातेचे महाद्वार बंद करण्याचा निर्णय मंदीर संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे. या कालावधीत भाविकांना कुंभार गल्लीतील झुलत्या पायऱ्यांवरून मंदीरात सोडण्यात येणार आहे. तर 200 रुपयांचे सशुल्क दर्शन पास तसेच रेफरल दर्शन पास बंद असणार आहे. मात्र. व्हीआयपींसह 500 रुपयांचे स्पेशल दर्शन पास,अभिषेक पूजा व सिंहासन पुजेच्या भाविकांना महाद्वारातुन सोडण्यात येणार आहे. 28 डिसेंबर पासून तुळजाभवानी मातेचा शांकभरी नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. भाविकांना सुलभ दर्शन व भाविकांचा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदीर संस्थानच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Karnataka Chitradurga Bus Accident : कंटेनर आणि बसच्या भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर येथे बस आणि कंटेनरचा अपघात होऊन लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर घडला आहे. कंटेनर ट्रक डिव्हायडरला धडकला आणि नंतर बसला धडकल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT