Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Updates : नागपुरात ठाकरे सेना स्वबळावर लढणार?

Maharashtra Breaking News Today : मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, तर कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसचे 69 उमेदवार अर्ज दाखल करणार, यासह आज 30 डिसेंबर 2025 रोजीच्या राज्यभरातील राजकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

नवी मुंबईत महायुती तुटली

भाजपा आणि शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दोन्ही पक्षांनी इच्छुकांना AB देण्यास सुरुवात केली आहे.

PMC Election: उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीतून पुन्हा ठाकरेसेनेत घरवापसी

शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या सुरज लोखंडे यांना उमेदवारी न मिळाल्याने पुन्हा शिवसेनेत घर वापसी केली आहे. दोन दिवसांपूर्वी सुरज लोखंडे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

Nagpur News: नागपुरात आघाडीत फूट

नागपूरात महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. ठाकरे सेना वबळावर लढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जागा वाटपावरून काँग्रेस उबाठा मध्ये रस्सीखेच सुरू आहे, 4 ते 5 जागांसाठी आघाडी तुटण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत तोडगा न निघणार का? हे लवकरच समजेल.

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का

अहिल्यानगरमध्ये ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव विक्रम राठोड यांनी राजीनामा दिला आहे. पक्षामध्ये सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामा दिला असून ते लवकरच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये करणार प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Mahanagar Palika : अजित पवारांच्या निवासस्थानी एबी फॉर्मचं वाटप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी एबी फॉर्मचं वाटप सुरू असून अजितदादांच्या भेटीसाठी जिजाऊ निवासस्थानी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. रुपाली ठोंबरे, माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह अनेक नेते देखील जिजाऊवर अजित पवारांच्या भेटीसाठी आले आहेत.

मुंबईतील जागावाटप पूर्ण भाजप 137 तर 90 शिवसेना जागा लढवणार - CM फडणवीस

BMC Election : आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं जागावाटप काल रात्री पूर्ण झाल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत दिली. 'भाजपा आणि शिवसेना महायुतीचे मुंबईतील जागावाटप पूर्ण झाले असून 137 जागा भाजप तर 90 जागा शिवसेना लढवणार आहे. महायुतीचे इतर घटकपक्ष यात समाविष्ट असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुंबईच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईकरांचे जीवन सुकर करण्यासाठी विकासाची कामे कुणी केली, हे मुंबईकरांना चांगलेच ठावूक आहे. त्यामुळेच मुंबईकर महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि प्रचंड बहुमताने महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील, हा आम्हाला विश्वास आहे.' असं ट्विट फडणवीसांनी केलं आहे.

बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचं निधन

बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी बीएनपी पक्षानं दिली. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ढाका येथील एव्हरकेअर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. खालिदा झिया यांचे पती झियाउर रहमान बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे आणि अग्रगण्य व्यक्ती होते. ते 1977 मध्ये बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष होते.

कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसचे 69 उमेदवार अर्ज दाखल करणार

कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसचे 69 उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. तर याआधी काँग्रेसने पहिली आणि दुसरी यादी जाहीर केली आहे. मात्र आता काँग्रेस तिसरी यादी जाहीर न करता उमेदवारांना थेट एबी फॉर्म देणार असून यात आणखी नव्या 12 उमेदवारांना संधी मिळणार आहे. 81 जागांपैकी काँग्रेस 69 जागांवर तर शिवसेना 11 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

Congress Candidate List BMC Election 2026 : मुंबईसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीच 52 जणांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT