उपराजधानी नागपुरात 31 डिसेंबरनिमित दारू सोडा दूध प्या, असा व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. नागपूरच्या व्हेरायटी चौकात 'रोडमार्क फाउंडेशन'तर्फे अनोखा उपक्रम राबवत नागरिकांना व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं. नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी अनेकजण मद्यपान करून रात्रीला वाहन चालवतात. त्यामुळं मोठे अपघात होतात. त्यापेक्षा दारू पिऊन जीव गमावण्यापेक्षा दूध पिऊन तंदुरुस्त आणि स्वस्थ राहा आणि सडक सुरक्षा जीवन रक्षा असा संदेश रोडमार्क फाउंडेशन तर्फे देण्यात आला.
संभाजीनगरच्या माजी उपमहापौर लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. भाजपसोडून ऐनवेळी शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यांनी बीजेपीच्या नावाने अर्ज भरला अन् एबी फाॅर्म शिवसेना शिंदेचा दिला.
छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौर लता दलाल यांनी नुकतंच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.
भाजप सोडून ऐनवेळी शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली होती.
त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.
ठाणे महापालिकेत भाजप व शिवसेनेत युती झाली आहे. या युतीमध्ये भाजपच्या वाट्याला ४० जागा आल्या आहेत. अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने भाजपचे आमदार संजय केळकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, युती धर्म पाळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या घरी बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे. बॉम्बने उडवून देण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने दिली आहे. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे. भांडूपमधील मैत्री या राऊतांच्या निवासस्थानी शोधपथक दाखल झाले आहे.
महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपसाठी खूशखबर आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये पक्षाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता धुळे महापालिकेतही भाजपने खाते उघडले आहे. या महापालिकेतही भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पनवेलमध्येही भाजपच्या एका उमेदवाराची लॉटरी लागली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान मोठी राजकीय घडामोडी घडली आहे. जागा वापटावरून झालेल्या वादानंतर महायुतीमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील महिला विभाग प्रमुख आणि माजी नगरसेविका सुजाता पाठक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर माजी नगरसेविका सुनंदा सुरेश पाटील, उपविभाग प्रमुख विनोद गायकवाड, ईशान्य मुंबई युवासेना विभाग प्रमुख गुरुजोत सिंग किर आणि इतर महत्वाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले.
वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जावेद पठाण यांचं आकस्मिक दुःखद निधन झालं
पुण्यात शिवसेनेने काँग्रेस सोबत युती केली मात्र समाधानकारक जागा मिळाल्या नाही, असा आरोप करत शाखा प्रमुख शशिकांत साटोटे यांनी थेट उद्धव ठाकरेंना पत्र पाठवत खंत व्यक्त केली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने महायुतीच्या विजयाचा शुभारंभ केला. प्रभाग क्र. १८ मधून रेखाताई चौधरी आणि प्रभाग क्र. २६-क मधून आसावरीताई केदार नवरे यांचा नगरसेविका पदी बिनविरोध विजय झाला. या विजयानंतर दोन्हीही विजयी उमेदवारांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे सहर्ष अभिनंदन करत नगरसेवक पदाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनीही फोन द्वारे दोघींचे अभिनंदन केले.
सांगली महापालिका निवडणुकीमध्ये मिरजेतील अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारा विरोधात भाजपा उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. माजी उपमहापौर असलेले मैनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारीवर भाजपचे उमेदवार अल्लाबक्ष गडेकर यांनी निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला आहे. महापालिकेच्या गटनेते पदी असताना बेकायदेशीरित्या वाहन वापरल्याप्रकरणी बागवान यांच्यावर 35 लाखांचा दंड होता. मात्र तो बागवान यांनी अद्याप भरलेला नाही, असा आरोप करत पालिकेकडून त्यांना उमेदवारीसाठी एनओसी कशी कशी दिला? असा सवाल उपस्थित करत त्यांच्या उमेदवारी अर्जाल आक्षेप घेतला आहे.
नवी मुंबईमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी पोलिसांकडून अडीच हजार पेक्षा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पनवेल आणि नवी मुंबईच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांची नजर असणार आहे. त्या ठिकाणी नवी मुंबई क्राईम ब्रांच लक्ष असणार आहे.
जालन्यात काल एका माझी नगरसेविकेचे तिकिट कापल्यामुळं माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासमोर आक्रोश करत थेट लोटांगण घातलं होतं. यावर कैलास गोरंट्याल यांनी स्पष्टीकरण दिलं असून कार्यकर्ते नाराज होणं स्वाभाविक आहे, त्यांची नाराजी दूर केली असल्याचं त्यांनी म्हटलंय.
अजित पवार राष्ट्रवादीविरोधात आक्रमक असलेले एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या महापालिका निवडणूक लागताच राग निवळल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार व राष्ट्रवादी पक्षावर माझा राग नाही, पक्षातील काही लोकांवर राग असल्याचं शिवसेना मंत्री भरत गोगावले म्हणाले. तर राज्यात 18 ठिकाणी शिवसेना-भाजप युती फिस्कटली, युती फिस्टकल्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढणार असल्याची मंत्री भरत गोगावले यांनी माहिती दिली.
पुणे महापालिकेसह अन्य ठिकाणी सर्वच पक्षांनी मराठा समाजाच्या उमेदवारांना डावलण्यात आले आहे. जाणूनबुजून मराठाविरूद्ध ओबीसी, असा वाद निर्माण केला जात आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी केला आहे.
नायब तहसीलदारांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याच्या 7/12 वर तलाठ्याने खोटी नोंद केल्या मुळे शेतकरी संताप्त व्यक्त करत आहे. खोच–शिरसोनपाडा इथल्या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर खोटी नावे नोंदविण्यात आल्याचा आरोप करत अर्जदार राजू भाऊ मालक यांनी रात्री नायब तहसीलदारांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने मोखाडा तालुक्यात खळबळ उडाली आहे. वेळेवर हस्तक्षेप झाल्याने मोठा अनर्थ टळला.
सोलापूर इथल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक गणेश वानकर यांनी भाजपाकडून फॉर्म भरल्याचं जाहीर केलं आहे. गणेश वानकर हे मागील 25 वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ होते. मात्र काल उमेदवारी भरण्याची वेळ संपल्यानंतर त्यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी दिली. प्रभाग 6 मधील 4 उमेदवारांचे शिवसेना ठाकरे पक्षाचे एबी फॉर्म गणेश वानकर यांच्याकडे होते. ते फॉर्म त्यांनी भरले का? या बाबतीत सस्पेन्स होता. मात्र आज याचा खुलासा करत शिवसेना ठाकरे पक्षाचे अर्ज न भरता भाजपचे अर्ज भरल्याची कबुली माजी नगरसेवक गणेश वानकर यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप प्रचार कार्यालयात सलग दुसऱ्या दिवशी तिकीट नाकरलेल्या इच्छुक उमेदवारांनी आंदोलन केले. उपोषणकर्त्या महिलांनी भाजप शहराध्यक्षांना सुनावले. मंत्री अतुल सावे, भागवत कराड यांच्या गाडीसमोर इच्छुकांनी गोंधळ घातल. त्यांचे फोटो जाळले. एका कार्यकर्त्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न.
भाजपचे पुण्यातील माजी नगरसेवक किरण बारटक्के यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यावर बारटक्के यांनी माझं काय चुकलं? असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रभागातील व भाजपच्या दुखावलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी पत्र पाठवत न्याय मागणार असल्याचे सांगितले. पुणे शहरात घडलेल्या सर्व प्रकाराबाबत प्रभाग क्रमांक ३२ मधील सर्व नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून पुण्यातील नेत्यांच्या तक्रारी करणार आहेत. असे त्यांनी सांगितले.
ठाकरे बंधूंनी केवळ सत्तेच्या मोहापायी हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर विचारांना तिलांजली दिली आहे. ज्या विचारांनी महाराष्ट्राला दिशा दिली, तेच विचार आज आपल्या अस्तित्वासाठी विकले जात आहेत,अशा शब्दांत भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी ठाकरे बंधूंवर सडकून टीका केली ठाकरे बंधूंची युती म्हणजे अस्तित्व टिकवण्याची धडपड आहे, असे देखील ते म्हणाले.
आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे हे गोळीबार प्रकरणात पोलिस कोठडीत आहेत. मात्र, ते नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी प्रभाग क्रमांक ११ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कारागृहातून ते निवडणूक लढणार आहेत.
उमेदवारी नाकारल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील प्रमिला केणी यांनी बंडाचा झेंडा फडकवत थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कळव्यातील प्रभाग क्रमांक २३ मधून २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. मात्र, या वेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आले.
नाशिकच्या सातपूरमधील पबमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेले RPI आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना आपले प्राधिकृत देण्यात आलेल्या व्यक्तिमार्फत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता लोंढे कारागृहातूनच निवडणूक लढवणार आहेत.
छत्रपती संभाजीनगरात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती तुटल्यानंतर शिंदेसेनेने तब्बल 99 उमेदवारांना पक्षाचे बी फॉर्म वाटले. यामध्ये तीन माजी महापौर आणि समावेश आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपच्या प्रभाग क्रमांक 18 अ मधील उमेदवार रेखा राजन चौधरी या विजयी झाल्यात जमा आहेत. कारण या जागेसाठी केवळ रेखा चौधरी यांनीच अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात इथे दुसऱ्या एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नसल्याने आता रेखा चौधरी यांचा विजय निश्चित झाला आहे. त्यामुळे निकालाआधीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे.
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील लष्कर आणि डेक्कन भागातील वाहतुकीत बदल केला आहे. तसंच मद्यपी चालकांविरोधात कारवाई देखील केली जाणार आहे. आज महात्मा गांधी रस्ता आणि जंगली महाराज रस्ता संध्याकाळी ५ नंतर रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. एफ सी रोडवर रात्री तरुणाईची मोठी गर्दी होते त्यासाठी वाहतूक पोलीस विभागाने निर्णय घेतला आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी २ हजार २९८ अर्ज दाखल झाले. तर, अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून अखेरच्या दिवसापर्यंत १६५ जागांसाठी ३ हजार ४१ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.रात्री उशिरापर्यंत दाखल झालेल्या अर्जाची माहिती नोंदविण्याचे काम सुरू होते. या अर्जाची छानणी आज ३१ डिसेंबरला होणार आहे.मंगळवारी एका दिवसात सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकूण २ हजार २९८ अर्ज आले. ४१ प्रभागातील १६५ जागांसाठी ३ हजार ४१ अर्ज दाखल झाले.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधीच प्रभाग क्रमांक 18 अ मधून भाजपने आपले विजयाचे खाते उघडले आहे. 18 अ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी केवळ भाजपच्या रेखा राजन चौधरी यांनी अर्ज दाखल केला होता, या जागेसाठी इतर कुणीही अर्ज दाखल केला नसल्याने. निकालाआधीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.