नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकांमध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतींचा समावेश असून, सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना निवडणूक आयोग आणि भाजप यांच्यातील साटेलोट्याचा गंभीर आरोप केला आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाडा विभागाच्या दगाबाज रे संवाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज उद्धव ठाकरेंनी बीड जिल्ह्यातील पाली गावात शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केवळ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवरही तीव्र टीका केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी सरकारवर घराघरात भांडण लावण्याचा गंभीर आरोप केला. उद्धव ठाकरेंनी पाली गावातील शेतकरी महिलांना लाडकी बहीण योजेनेवर प्रश्न विचारले. या सभेला उपस्थित असलेल्या महिलांना थेट प्रश्न विचारत त्यांनी टीकेला सुरुवात केली. इथे अनेक महिला आल्या आहेत.
उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी बीड जिल्ह्यातील पाली गावात शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी आणि व्यथा उद्धव ठाकरेंसमोर मांडल्या. त्यांनी सांगितले की, सरकारने दिलेली मदत अपुरी आहे आणि कर्जमुक्ती तात्काळ मिळाली पाहिजे. तसेच सरकारने दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत, अशीही शेतकऱ्यांची तक्रार आहे. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून घेतल्या आणि त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
राहुल गांधी यांनी आरोप केले की, हरियाणात जे घडले तेच आता बिहारमध्येही होणार आहे. बिहारमधील मतदार यादीत मोठी गडबड झाली असून अनेकांचे नावे यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत काही मतदारांना मंचावर बोलावून दाखवले की त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची नावेच मतदार यादीतून गायब आहेत.
राहुल गांधी म्हणाले की ही ब्राझीलची महिला हरियाणाच्या मतदार यादीत कशी आली? त्यांच्या म्हणण्यानुसार, हरियाणात पाच प्रकारात तब्बल 25 लाख बनावट मतं आढळली असून 5 लाखांहून अधिक डुप्लीकेट मतदार आहेत. राज्यात एकूण दोन कोटी मतदार असून प्रत्येक आठव्या मतदारात एक मतदार फेक असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. यामुळे काँग्रेसचा पराभव झाल्याचे ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एक युवतीचा फोटो दाखवत मोठा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की या युवतीने वेगवेगळ्या नावांनी कधी सीमा, कधी सरस्वती अशा 22 ठिकाणी मतदान केले आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे "एच फाइल्स" या शीर्षकाखाली पत्रकार परिषद घेत आहेत. या वेळी त्यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप केला. बिहारमधील १२१ विधानसभा जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान काही दिवसांवर आले असताना ही पत्रकार परिषद घेण्यात येत आहे. काँग्रेसने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर या पत्रकार परिषदेचे वर्णन “हायड्रोजन बॉम्ब लोडिंग” असे केले होते. राहुल गांधी म्हणाले की, लोकशाही वाचवण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
स्थानिक निवडणुकीत सिंधुदुर्गात भाजपने एकला चलो रे चा नारा दिला आहे. सिंधुदुर्गात शिवसेनेसोबत युती नको स्वबळावरच लढूया, असा आग्रह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे. सावंतवाडी येथे आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपची बैठक होणार आहे.
देश पातळीवर 1 डिसेंबरपासून व्याघ्रगणना सुरु होत आहे. तीन टप्प्यांमध्ये ही व्याघ्रगणना होणार आहे. जागतिक व्याघ्रदिनाच्या दिवशी 26 जुलै 2026रोजी ही व्याघ्रगणना जाहीर करण्यात येणार आहे.. यंदा वाघांची संख्या मोजण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
उद्धव ठाकरे यांना स्थानिक निवडणुका पुढे ढकलायच्या आहेत, त्यांना टोमणे मारण्याशिवाय काय येते, विकासावर त्यांचे एक भाषण दाखवा, एक हजार रुपये मिळवा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
मराठवाड्यानं सर्वात मोठा पावसाचे संकट अनुभवले आहे. मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना मदत केली होती. आता हे सरकार कशाचा अभ्यास करणार आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. सरकारचं पॅकेज ही थट्टा आहे, असे ठाकरे म्हणाले. संकट आले असताना आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बिहार दौऱ्यावर आहेत, असे ठाकरे म्हणाले.
बिहार विधासभा निवडणुकीच्या पहिला टप्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. पहिल्या टप्यात १२१ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
मनसेसोबत आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत युती करण्यास काँग्रेस नेत्यांची विरोध असल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मनसेसोबत युती करण्यास अनुकूल नसल्याचे सांगितले जात आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रामराम केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ते प्रवेश करणार आहे. हा पक्षप्रवेश सोहळा गुरुवारी (६ नोव्हेंबर) चाकण येथे होणार आहे.
भारताच्या प्रसिद्ध फिल्म निर्मात्या मीरा नायर आणि युगांडतील भारतीय वंशाचे लेखक महमूद ममदानी यांचे पुत्र जोहरान महमूद हे अमेरिकेतील न्यूयाॅर्क शहराचे महापौर म्हणून विजयी झाले आहेत.
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीचे पुन्हा सरकार येईल, असा अंदाज 'पोल ऑफ पोल्स'ने वर्तवला आहे. एनडीएला 143, महागठबंधनला 95 जागा मिळण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तसेच भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या “दाही दिशा' या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलातना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, एकनाथ शिंदेसाहेब हे महिलांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. आतापर्यंत मी 29 पुस्तके गेल्या 30 वर्षांत लिहिलेली आहेत. महिला धोरणे जी वेगवेगळी झाली, त्याचबरोबर स्त्रियांच्या अत्याचाराच्या विरोधात प्रतिबंध करण्यासाठी काय करता येईल, याची यशस्वी झालेली उदाहरणे या पुस्तकामध्ये लिहिलेली आहेत.
मुलांना डांबून ठेवून माजी मंत्र्यांशी बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. एन्काऊंटर प्रकरणी मानवाधिकार आयोगाकडून चौकशीचे आदेश दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.