गुजरातचा हापूस दाव्यावर, भाजप मंत्री नीतेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा मागण्या कोणी करू शकत, मागणी करण्यात काही हरकत नाही. आमच्या कोकणातील हापूस आंब्याची बाजू लावून धरण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. केंद्रात खासदार राणेसाहेब आहेत. खासदार सुनील तटकरेसाहेब आहेत. माहितीचे सगळे लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही सगळे ताकदीने आमच्या हापूस आंब्याच्या मागे उभे आहोत, असे नीतेश राणे यांनी म्हटले.
'बाबासाहेब आज असते, तर त्यांनी आज असलेल्या लोकशाहीचा धिक्कार केला असता. आज लोकशाही लोकांच्या अंगावर दडपण्याचा प्रयत्न होत आहे. 2014 नंतर जो नेता आला, तेव्हा हा नेता नाहीतर अभिनेता आहे,' अशी टीका खासदार मुकुद वासनिक यांनी केली.
सांगली ईश्वरपूरमध्ये निवडणुकीनंतर करणी भानामतीचा प्रकार समोर आला आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या घरासमोर हा करणीचा प्रकार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका कागदात काळी बाहुली आणि करणीचे साहित्य गुंडाळून रात्रीच्या दरम्यान टाकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला आज 69 वर्ष पूर्ण होत आहेत. मंत्री भरत गोगावले यांच्यासह राज्यभरातून आलेले भीम अनुयायी यांनी चवदार तळे इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. शिवसृष्टीप्रमाणे महाडमध्ये भिमसृष्टी करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी दिली.
जगभरात कोकणच्या देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याला मोठी मागणी आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांना याच हापूस आब्यांने आर्थिक सुबत्ता मिळवून दिली. मात्र आता गुजरात राज्यातील गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं 2023 मध्ये वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी मागणी केली. त्यामुळे कोकणातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशा प्रकारे जर कोकण हापूसची ओळख पुसण्याचा प्रयत्न झाल्यास हे सहन करणार नसल्याचा इशारा कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे.
अकोला जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं आपलं आयुष्य संपवलं. गोपाल वामनराव पाटेखेडे, असं या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. आत्महत्यापूर्वी या शेतकऱ्यानं एक व्हिडिओ तयार केला. सावकाराच्या ज्याच्याला कंटाळून आत्महत्या केल्याचा या व्हिडिओतून आरोप केला आहे. व्याजासकट पैसे पूर्ण देऊनही वारंवार पैशाची मागणी होत असल्याचा आरोप, या आत्महत्यापूर्वी बनवलेल्या व्हिडिओतून करण्यात आला.
मुंबई-गोवा महामार्गावर सरकार आणि ठेकेदाराच्या विरोधात, रायगड-माणगावमध्ये जन आक्रोश समितीने तिरडी यात्रा काढली. मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याने निदर्शनं केली. तिरडीची यात्रा काढत सरकार आणि ठेकेदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
महाराष्ट्रातील कोट्यवधी वारकरी आणि विठ्ठल भक्तांची श्रद्धास्थान असलेली, चंद्रभागा पुन्हा प्रदूषणाचा विळख्यात सापडली आहे. शेवाळ वाढल्याने नदीपात्रातील पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. नदी पात्रात पाणी कमी आणि प्रदूषण अस्वच्छता अधिक, अशी स्थिती आहे. फक्त आषाढी वारीच्या काळातच प्रशासन चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेकडे लक्ष देते इतर वेळी मात्र याठिकाणी अस्वच्छता पसरलेली दिसते.
वाराणसी विभागाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेल्या चार वंदे भारत गाड्यांच्या उद्घाटनासाठी तब्बल 3 कोटी 37 लाख 93 हजार 351 रुपयांचा खर्च झाल्याची माहिती उघड झाली आहे. अमरावतीचे अजय बोस यांनी RTI अर्जाला उत्तर देताना पूर्वोत्तर रेल्वेच्या वाराणसी मंडळाने हा खर्च अधिकृतपणे जाहीर केला आहे. 8 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमातील सर्व खर्चाचा हा तपशील असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जळगाव इथून तीन अल्पवयीन मुलींचे अपहारण प्रकरण झालं असून, या तिन्ही मुली ज्या शाळेत शिकत होत्या. त्या शाळेच्या शिक्षकांनी तिन्ही मुलींच्या पालकांना शाळेत बोलावलं होतं. दरम्यान या तिन्ही मुलींना ही माहिती मिळाल्यानंतर त्या अचानक बेपत्ता झाल्या. धक्कादायक म्हणजे तिन्ही मुलींनी बँक पासबुक सोबत नेल्याची पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मुलींच्या शोधासाठी सहा पथकांची स्थापना केली आहे. मध्यप्रदेश अन् महाराष्ट्रात शोध घेतला जात आहे.
पुणे ते मुंबई दरम्यान उद्या मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे विविध एक्सप्रेस रद्द करण्यात येणार असून पुणे लोणावळा लोकलच्या काही फेऱ्या देखील रद्द करण्यात येणार आहेत. यामध्ये सिंहगड एक्सप्रेस ,डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश असून पुणे मुंबई या मार्गावर धावणाऱ्या एकूण 17 रेल्वे रद्द केल्या जाणार आहेत.
नाशिक येथील तपोवनातील वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमींनी सुरू केलेल्या आंदोलनात मनसे सहभागी झाली आहे. वृक्षतोडीविरोधात मनसेने आज आंदोलन केलं आहे. मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोतकर आणि शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठी कलाकारांनी सेव्ह तपोवन मोहिमेत सहभागी झाले आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आज पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये ही आपली इच्छा आहे, असं वक्तव्य माध्यमांसमोर केलं.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आज पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. नुकतंच जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर राजीनामा देणार असल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.
आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. यावेळी फडणवीसांनी पुढच्या वर्षभरात इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस असल्याचं सांगितलं.
शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराने थेट मुंबई महापालिकेच्या महापौर पदावर दावा केला आहे. महायुती झाली नाही तर मुंबईवर आमचाच महापौर असेल, असा दावा आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. ते म्हणाले, 'मुंबईमध्ये जिंकायचे असेल तर महायुती झाली पाहिजे. जे नगर पालिकेत झाले त्याचा फटका आम्हाला बसला आणि फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. याची काळजी दोन्ही पक्षाचे नेते घेतील. जास्त जागा भाजप लढणार असल्याने ते ठामपणे सांगू शकतात की महापौर आमचा होईल. मात्र, जर महायुती झाली नाही तर आम्ही आमचा महापौर करु.
दीपाली पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात संदीप गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा तोच आरोपी आहे ज्याच्या पत्नीला भाजपने नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे. स्वतःचं लग्न झालं असतानाही एका नर्तिकेवर लग्न करण्यासाठी दबाव आणल्यामुळं तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ या आरोपीमुळे आली. या घटनेमुळे भाजपचा खरा चेहरा पुढं आला आणि असे अनेक नमुने आहेत ज्यांना भाजपने नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी दिली, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
जामखेडमध्ये नृत्यांगणा यांच्या आत्महत्या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांच्यावर जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपाली यांच्यावर लग्नासाठी संदीप गायकवाड हा दबाव टाकत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
डोंबिवली मधील सावित्रीबाई फुले रंगमंदिराचे नूतनीकरण आणि डोंबिवली (पू.) भूखंड क्र. ४९ या सुविधा भूखंडावर प्रेरणा वॉर मेमोरीयल सेंटर उभारण्याच्या विकास कामाचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार आहे. या कार्यक्रमला भाजप प्रदेश अध्यक्ष आणि डोंबिवली रवींद्र चव्हाण यांना सुद्धा आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे या शिंदे-चव्हाण एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.