Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update: नगरपालिका निवडणूक स्वबळावर, सिंधुदुर्गात भाजपचा निर्णय

Maharashtra Politics Breaking Live Marathi Headlines Updates: 6 नोव्हेंबर 2025 च्या राज्य आणि देशभरातली महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एकाच क्लिकवर

सरकारनामा ब्यूरो

राज ठाकरे आज पुण्यात; 'मिशन पुणे'साठी शाखा अध्यक्षांना बैठका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पुणे शहरातील मनसे शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. बैठकीत राज ठाकरे पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत आणि आगामी निवडणुकीसाठी रणनीतीवर चर्चा करणार आहेत. पुणे शहरातील सर्व मनसे नेते व कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

बिहारमध्ये आज निवडणुकीची रणधुमाळी! 18 जिल्ह्यांतील 121 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 'कांटे की टक्कर', कोणाचे पारडे जड?

बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील 18 जिल्यांतील 121 जागांसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. मतदारांमध्ये उत्साह असून सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या आहेत. प्रशासनाने सुरक्षेची कडक व्यवस्था केली आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आज दुसरा दिवस

राज्यात अतिवृष्टीनं त्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उद्धव ठाकरे महिन्याभरात दुसऱ्यांदा मराठवाड्यात पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन देत कर्जमाफीची मागणी केली. तसेच आज त्यांच्या या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचे संवाद साधला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. त्यांनी संघातील खेळाडूंना भेटून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. मोदींनी त्यांच्या परिश्रम, जिद्द आणि देशासाठीच्या कामगिरीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे सामाना होणार

गणेश नाईक यांच्याकडे ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगपालिका निवडणुकीसाठी भाजपने निवडणूक प्रभारी पद दिले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंसोबत युती नको - उद्धव ठाकरे

आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यामध्ये युती होण्याची चर्चा होती. मात्र, या चर्चांमधील हवा काढत कुठल्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंसोबत युती नको, असा स्पष्ट संदेश उद्धव ठाकरेंनी कार्यर्त्यांना दिला आहे..

शेतकऱ्यांची घरं पाडली, महिला संतप्त; मंत्री गिरीश महाजनांची गाडी आडवली

कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा 100 मीटर जागा संपादित होणार आहे. त्यासाठी एन एम आर डी एन ए कडून शेतकऱ्यांची घरे आणि बांधकामे पाडण्यात आली. संदर्भात शेतकरी आणि महिलांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची गाडी अडवून कैफियत मांडली. यावेळी महाजन गाडीतच बसून राहिले. त्याबाबत महिलांनी नाराजी व संताप व्यक्त केला

बिहारमध्ये मतदान सुरू 

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील 121 जागांसाठीचे मतदान सुरु झाले आहे. एनडीए विरुद्ध महागठबंधन अशी थेट लढत होत आहे. प्रशांत किशोर हे देखील या निवडणुकीत उतरले असून जनसुराजचे त्यांचे उमेदवार देखील विजयाचा दावा करत आहेत.

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर

मनसे प्रमुख राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ते निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. मुंबईत शिवसेनेसोबत युती होणार हे निश्चित मानले जात असताना पुण्याबाबत देखील ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

आमदार किशोर पाटलांना शेतकऱ्यांची चिंता नाही- मंगेश चव्हाण

एकीकडे विकासकामांना निधी मिळत नसल्याचे आमदार किशोर पाटील सांगतात मात्र दुसरीकडे पूर्ण पाचोरा भडगाव मतदार संघ हा अतिवृष्टीत सर्वाधिक नुकसान झालेल्या असताना देखील बागायती ऐवजी जिरायती पंचनामा लावल्यामुळे अतिवृष्टी अनुदान मिळण्यात शेतकऱ्यांचे 30 ते 35 कोटी रुपयांचे नुकसान झाले याची मात्र काळजी आमदार किशोर आप्पा यांना नाही, अशी टीका भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी किशोप पाटलांवर केली

नगरपालिका निवडणूक स्वबळावर, सिंधुदुर्गात भाजपचा निर्णय

स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा भाजपचा निर्णय घेतला आहे. निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार नितेश राणे, आमदार प्रमोद जठार यांची निवड भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT