Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : हिंदुत्ववादी संघटनांमुळेच राज्यात महायुतीचे सरकार - राधाकृष्ण विखे पाटील

Marathi latest Politics live news updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आणि मेट्रो 3 च्या अखेरच्या टप्प्याचं आज उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. यासह राज्यभरातील इतर महत्वाच्या घडामोड जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबाला तानाजी सावंतांकडून मदत

मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या संजय पवार यांच्या कुटुंबाला माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी तीन लाख रुपयाची मदत केली आहे. बीडच्या घोसापुरी गावातील संजय पवार यांचा मुंबई येथील मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्यु झाला होता.

Beed News: बीड पुन्हा हादरले

बीडमध्ये शेतीच्या वादातून थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनवती गावात भावकीतील चार जणांनी एका महिलेला निर्दयीपणे मारहाण करून तिचे पाय तोडण्याचा प्रयत्न केलाय. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडिता आश्विनी येडे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nagpur News: नागपूरात महसुल सेवकांचे उपोषण सुरु

नागपूरात महसुल सेवकांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. संविधान चौकात आंदोलन सुरू आहे. कोतवाल यांना चतुर्थ श्रेणी मिळावी, यासाठी महसूल सेवक संघटनेचं आंदोलन सुरु आहे. उपोषणामुळे गावगावातील सर्वे, पंचनामा, आणि महसूल विभागाच्या गाव स्तरावरील कामांवर परिणाम झाला आहे.

Radhakrishna vikhe Patil : हिंदुत्ववादी संघटनांमुळेच राज्यात महायुतीचे सरकार - राधाकृष्ण विखे पाटील

विधानसभा निवडणुकीत हिंदुत्ववादी संघटनांनी समाजात केलेल्या प्रबोधनामुळेच राज्यात महायुतीचे सरकार आलं. त्यांच्या आशीर्वादाने मिळालेले हे यश म्हणजे महाराष्ट्राने देशापुढे एक उदाहरण निर्माण केल्याचं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी 1 कोटींची मदत

राज्यातील अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक देवस्थानांकडून मदतीचा हात पुढे केला जात आहे. अशातच आता पुण्यातील प्रसिद्ध अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने देखील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तब्बल 1 कोटींचा निधी दिला आहे. ही मतद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

Shivsena : शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होईल का? असीम सरोदेंंनी उपस्थित केला प्रश्न

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्ह प्रकरणाची अंतिम सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडणार आहे. मात्र, ही सुनावणी होण्यापूर्वीच आता सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी एक्सवर पोस्ट करत मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. असीम सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण जस्टीस सूर्यकांत यांच्या बेंचसमोर आज 16 नंबरला लागलेले असल्याने ते प्रकरण सुनावणीसाठी रिच होणार हे नक्की. परंतु एका इतर एका अर्धवट सुनावणी झालेल्या प्रकरणातील बेंचचे सुद्धा जस्टीस सूर्यकांत सदस्य न्यायाधीश आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होईल का? असे प्रश्नचिन्ह आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यातर्फे असे प्रयत्न होतीलच की सुनावणी पुढे ढकलली जावी.' असं ट्विट करत सरोदे यांनी आजची सुनावणी पुढे ढकलली जावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रयत्न केले जातील असा संशय व्यक्त केला आहे.

Miraj Clash : सांगलीतील मिरजेत दोन गटात तुफान राडा, पोलिसांकडून लाठीचार्च

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे दोन गटात मोठा राडा झाल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्या शहरात मोठा पोलिस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. मिरज शहरातील नदीवेस परिसरातील एका गल्लीत वेगवेगळ्या समाजातील दोन ओळखीचे तरुण रात्री बोलत बसले होते. बोलत असताना दोघांकडून एकमेकांच्या समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्यामुळे चर्चेचं रुपांतर वादात झालं.

यावेळी एका समाजाच्या गटाकडून तरुणास मारहाण करण्यात आली. तर संबंधित तरुणावर कारवाई करावी, या मागणीसाठी जमाव मिरज शहर पोलीस ठाण्यात जमला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, तरीही त्या मुलाच्या घरासमोर जमलेल्या जमावातील काहींनी तेथील राजकीय नेत्यांचे पोस्टर फाडल्यामुळे वाद चिघळला आणि त्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवस मुंबई दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्यांच्या हस्ते नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आणि मेट्रो 3 च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन होणार आहे.

Narendra Modi Navi Mumbai Airport : पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आणि मेट्रो 3 च्या अखेरच्या टप्प्याचं आज उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे या विमानतळावर सर्वप्रथम पंतप्रधानांचं विमान उतरणार असून या विमानाला अग्निशमन दलाकडून पाण्याची सलामी देण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT