MLA Namita Mundada News :  Sarkarnama
मराठवाडा

Beed News : नमिता मुंदडांच्या प्रयत्नांना यश; रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी १५० कोटींचा निधी मंजूर

MLA Namita Mundada News : कर्मचाऱ्यांनी आमदार नमिता मुंदडा यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ही कैफियत मांडली.

सरकारनामा ब्यूरो

Beed News : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी ३५२ नवीन निवासस्थानांच्या बांधण्यासाठी राज्य शासनाने बुधवारी तब्बल १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे जीर्ण झालेल्या निवासस्थानांचे नव्याने बांधकाम होणार आहे.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ हे आशिया खंडातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आमदार नमिता मुंदडा यांच्या सासू दिवंगत लोकनेत्या व तत्कालिन आरोग्यमंत्री डॉ. विमलताई मुंदडा यांच्या पुढाकाराने अनेक सुविधा मिळाल्या. महाविद्यालय व रुग्णालयासासाठी नव्या इमारतीसह अनेक उपकरणे दिवंगत डॉ. मुंदडा यांच्या पाठपुराव्याने मंजूर होऊ कार्यान्वित देखील झाली.

अलीकडे येथील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ५० वर्षांपूर्वीचे जुनाट बांधकाम मोडकळीस आल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरुन रहावे लागत होते. निवासस्थानांच्या खिडक्या मोडकळीस आल्या असून भिंतीवरही मोठमोठी झाडे उगवली आहेत. तसेच नळ, स्वच्छतागृह मोडकळीस आली होती, पावसाळ्यात इमारतींचे छताला गळती लागल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती. कर्मचाऱ्यांनी आमदार नमिता मुंदडा यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ही कैफियत मांडली. (Beed News)

त्यावर आमदार मुंदडा यांनी निवासस्थानांना भेट देऊन दुरावस्थेची पाहणी केली. निवासस्थानांना निधी मंजूर करण्यासाठी प्रस्ताव मागवून त्यांनी मंत्रायलय व सरकार स्तरावर स्वत: पाठपुरावा केला.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन याबाबत आग्रही मागणी केली. अखेर आमदार मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश आले असून शासनाने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी वर्ग तीन कर्मचाऱ्यांच्या २५६ निवासस्थाने बांधण्यासाठी ११२ कोटी ३७ लाख रुपये तर वर्ग चार कर्मचाऱ्यांसाठी ९६ निवासस्थाने बांधण्यासाठी ३७ कोटी १६ लाख असा तब्बल दिडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने लवकरच कर्मचाऱ्यांना अद्यावत नवी कोरी निवासस्थाने मिळणार आहेत.

"अहोरात्र रुग्णसेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल समाधानी आहे. अंबाजोगाईचे वैभव आणि रुग्णांची जीवनवाहिनी असणाऱ्या स्वाराती रुग्णालयातील प्रत्येक अडचण सोडवून उच्च दर्जाची रुग्णसेवा मिळावी यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू," अशी भावना नमिता मुंदडा यांनी व्यक्त केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT