Minister Abdul Sattar News, Aurangabad
Minister Abdul Sattar News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar : मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्याला साडेतीनशे बसेसमधून २५ हजार शिवसैनिक नेणार..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : येत्या पाच तारखेला म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी मुंबईत दोन दसरा मेळावे होणार आहेत. एक उद्धवसेनेचा शिवाजीपार्कवर तर दुसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बीकेसी मैदानावर. या मेळाव्यातून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी दोन्ही बाजूने सुरू करण्यात आली आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आपल्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून तब्बल २५ हजार शिवसैनिकांना मुंबईत मेळाव्यासाठी घेऊन जाणार असल्याचा दावा केला आहे.

साडेतीनशे बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे, पण लोकांचा उत्साह पाहून आम्हाला आणखी दीडशे बससेची व्यवस्था करावी लागणार असल्याचेही सत्तार यांनी स्पष्ट केले. (Marathwada) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐकण्यासाठी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून २५ हजारहून अधिक शिवसैनिक मुंबईच्या बिकेसी मैदानावर दसरा मेळाव्यासाठी जाणार आहेत. यासाठी ३५० बसेसचे नियोजन झाले असून मतदारसंघातून ५०० बसेसची मागणी होत असल्याचा दावा देखील सत्तार यांनी केला आहे.

अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत आज शहरातील सेना भवन परिसरात मेळाव्याच्या पूर्वतयारी बाबत बैठक संपन्न झाली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना सत्तार म्हणाले, एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. जनसामान्यांत प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे. त्यामुळे बिकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याची सभा ना भूतो ना भविष्यती अशी ऐतिहासिक होईल.

मुंबईला जाण्यासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करण्यात आली असून जेवण, चहा, पाणी, नास्ता यासह रुग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक यासारख्या आवश्यक सोयी सुविधा प्रवास दरम्यान शिवसैनिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे २० तास लोकांची कामे करतात, त्यामुळे विरोधकांची झोप उडाली आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा जपत प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम राज्यात होत आहे. एकनाथ म्हणजे लोकनाथ अशी भावना जनसामान्यांतुन व्यक्त होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून प्रचंड संख्येने या, असे आवाहन देखील सत्तार यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT