Fir Filed Against Protester News, Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar News : औरंगजेबाचे पोस्टर झळकावणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोध सुरू..

Police : छत्रपती संभाजीनगर शहर सिटी चौक पोलिसांनी चार अज्ञात व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध दर्शवण्यासाठी कालपासून सुरू झालेल्या साखळी उपोषणात औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्यामुळे खळबळ उडाली होती. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नामांतरविरोधी कृती समितीने साखळी उपोषण सुरू केले होते. दुपारी अचानक एक तरुण औरंगजेबाचे पोस्टर घेवून आंदोलनात सहभागी झाला होता.

हे पोस्टर पाहून उपस्थितीत तरुणांनी घोषणाबाजी सुरू केल्याने गोंधळ उडाला होता. (Fir Filed) दरम्यान, पोस्टर घेवून आलेल्या तरुणांचा आंदोलनासी आणि (Aimim) एमआयएमशी काहीही संबंध नसल्याचे सांगत हा आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे इम्तियाज यांनी म्हटले होते. दरम्यान, औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. संबंधितावर कारवाईची मागणी देखील केली गेली.

अखेर आज या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. छत्रपती संभाजीनगर शहर सिटी चौक पोलिसांनी चार अज्ञात व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी कलम 153 (अ) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात व्यक्तींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यास नुकतीच केंद्र सरकारने मंजुरी दिली होती.

या निर्णया विरोधात इम्तियाज जलील यांच्या आवाहनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून काल औरंगजेबाचे पोस्टर झळकावण्याचा प्रकार घडला होता. आंदोलनाला बदनाम करण्यासाठी, गालबोट लावण्यासाठी कुणीतरी औरंगजेबाचे फोटो देवून या तरुणांना घुसवले असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला होता. हा प्रकार घडताच आम्ही सदर तरुणांना आंदोलनस्थळावरून बाहेर हाकलले, असेही इम्तियाज यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकारानंतर संबंधितावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT