Nanded News : राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात मराठा समाज आंदोलनात उतरलेला आहे. दरम्यान, नांदेड येथे मराठा समाजाच्या आंदोलनात एक अनोखी गोष्ट समोर आली आहे.
आंदोलन काळात एका दाम्पत्याच्या घरी मुलगी जन्माला आली, त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाची आठवण म्हणून या दाम्पत्याने आपल्या नवजात मुलीचे नाव 'आरक्षणा' असे ठेवले आहे. यामुळे आता याची राज्यभर चर्चा होत आहे. (Latest Marathi News)
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील आतम राजेगोरे या तरुणाचा विवाह दोन वर्षांपूर्वी गायत्री कंकाळ या तरुणीशी झाला. गेल्या आठवड्यात नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. त्यात आतम राजेगोरे याचा सक्रिय सहभाग होता. मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून आतम राजेगोरे हा तरुणदेखील गावात उपोषणावर बसला होता.
मागील सोमवारी 30 ऑक्टोबर रोजी त्याचे उपोषण सुरू असताना, त्यांची पत्नी गायत्री हिने मुलीला जन्म दिला. मराठा आरक्षण आंदोलनं काळात मुलीचा जन्म झाल्याने या दाम्पत्याने आपल्या मुलीचे नाव 'आरक्षणा' असे ठेवले.
मराठा आरक्षणासाठी कधी नव्हे असे ऐतिहासिक आंदोलन झाले. यापूर्वी कधीही असे आंदोलनं झाले नाही. त्यामुळे या मराठा आरक्षण आंदोलनाची आठवण म्हणून आपल्या मुलीचे नाव 'आरक्षणा' ठेवल्याचे आतम राजेगोरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.