Deligation Met Amadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यासाठीच पडताळणी समित्या काम करतात का ?

A delegation of Sakal Adivasi Mahadev Koli tribe met Ambadas Danve : राज्यातील चार खासदार व 25 आदिवासी आमदारांच्या दबावापोटी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हतबल होत आहेत. सरकार पाडण्याचा दबाव त्यांच्यावर आणला जातो. मराठवाड्यात लोकशाही पध्दतीने अनेक आंदोलन, उपोषण करण्यात येत आहेत.

Jagdish Pansare

Cast Verification News Marathwada : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनुसूचीत जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या ह्या ठराविक जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध करण्यासाठीच स्थापन करण्यात आल्या आहेत का ? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सकल आदिवासी महादेव कोळी जमातीच्या शिष्टमंडळाने सोलापूर दौऱ्यावर असलेल्या दानवे यांची भेट घेत समाजावर होत असलेल्या अन्यायाचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला.

अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना सकल आदिवासी कोळी महादेव, मल्हार, कोळी डोंगरे, कोळी ढोर जमातीच्या वतीने भेट घेऊन या समाजावर कसा अन्याय होतो. ठराविक क्षेत्रातील आदिवासी आमदारांची लाॅबी विस्तारीत क्षेत्रातील समाजावर कसा अन्याय करतात ? याबाबतची माहिती दिली. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, डोंगरे कोळी, टोकरे कोळी या जमातींचे स्वातंत्र्यापूर्वीचे अनेक ब्रिटीशकालीन, निजामकालीन, शासकीय पुरावे असतांनाही आदिवासी विकास विभागाकडून जात पडताळणी समित्या ह्या जाणीव पूर्वक प्रकरणे अवैध ठरवत आहेत.

मात्र अवैध केलेल्या प्रकरणात मा. उच्च न्यायालयाने हजारो प्रकरणात वैधता असल्याचे निकाल दिले असून उच्च न्यायालय जर प्रमाणपत्र वैध ठरवत असेल तर पडताळणी समित्या ह्या केवळ अवैध करण्यासाठीच आहेत काय ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत होत असल्याचे दानवे म्हणाले. मराठवाडा विभागात दोन जातपडताळणी समिती आहेत. लाभार्थ्यांनी दाखल केलेल्या पुराव्याकडे पडताळणी समिती, शासन का दुर्लक्ष करते ?

2011 पासून जातवैधता देणे बंद करण्यात आले असून आदिवासी विभागाने सुरू केलेले हे दुष्टचक्र कधी थांबणार ? आम्हाला आदिवासी विभागाच्या पडताळणी समितीकडून न्यायच मिळत नसल्याची कैफियत शिष्टमंडळाने अंबादास दानवे यांच्याकडे मांडली. (Marathwada) शिवाय राज्यातील चार खासदार व 25 आदिवासी आमदारांच्या दबावापोटी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हतबल होत आहेत. सरकार पाडण्याचा दबाव त्यांच्यावर आणला जातो. मराठवाड्यात लोकशाही पध्दतीने अनेक आंदोलन, उपोषण करण्यात येत आहेत.

मराठवाड्यातील 46 मतदार संघातील जवळपास 15 मतदार संघात अनुसूचीत जमातीची मतदार संख्या निर्णायक आहे. भविष्यात मराठा, महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीच्या मतांचे ध्रुवीकरण होऊन मराठवाड्यातील सिल्लोड, निलंगा, भोकरदन, मुखेड, बिलोली, हदगाव, औसा, भोकर, उमरगा, अहमदपूर, उदगीर, गंगाखेड, पाथरी, कळंब, लातूर ग्रामीण यासारख्या 14-15 मतदार संघात महायुतीला फटका बसणार आहे, याकडेही शिष्टमंडळाने दानवे यांचे लक्ष वेधले. तसेच आमचा प्रश्न लवकर सोडवावा, अशी मागणी केली. यावर लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू, असे अश्वासन अंबादास दानवे यांनी या शिष्टमंडळाला दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT