Industries Minister Uday Samant News, Aurangabad
Industries Minister Uday Samant News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेने उद्योगमंत्री सावंत यांच्या नावाने उकळले वीस लाख..

सरकारनामा ब्युरो

Marathwada News : नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. (Crime News) विशेष म्हणजे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नावाने एका महिलेने ही फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार लक्षात येताच उद्योग मंत्री सामंत यांनीच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले, त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी विभागाचे क्षेत्र व्यवस्थापक अशोक रसाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फसवणूक करणारी ती महिला उस्मानपूरा परिसरातील रहिवासी आहे. (Fir Filed) सदर महिला ब्युटी पार्लर चालवत आहे. या महिलेने आपला मुलगा केदार काटे हा उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे संपुर्ण काम बघतो. असे सांगत संदीप कुलकर्णी व दिलीप कुलकर्णी यांची दिशाभुल केली.

कुलकर्णी यांच्या भाच्याला नोकरीची गरज असल्याने त्यांनी त्या महिलेवर विश्वास ठेवला. नोकरी लावण्याचे आमिष दाखवत त्या महिलेने रोख २० लाख रुपये घेतले. तसेच उर्वरित पाच लाख रुपये नोकरीची ऑर्डर मिळाल्यानंतर देण्याचा करारनामाही करुन दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, उद्योग मंत्री सामंत यांना या फसवणूक प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी संबंधित महिले विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानूसार नोकरी लावण्याचे आमिष दाखवत कुलकर्णी यांची आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणी तसेच औद्योगिक विकास महामंडळाची बदनामी केली, उद्योग मंत्री व शासनाची प्रतिमा मिलन करुन फसवणूक केल्या प्रकरणी फिर्यादी अशोक रसाळ यांनी संबंधित महिले विरोधात तक्रार दिली, त्यानंतर उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT