Chhatrapati Sambhajinagar News : माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश मिळाल्यापासून याची चर्चा राज्यभरात होत आहे. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी यावरून उद्धव ठाकरेंचा पक्ष आता मामूंचा झाला आहे, असा टोला लगावला होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रवेशावरून उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर तोंडसुख घेतले होते. मामू यांच्या पक्षप्रवेशाला दुसरे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा तीव्र विरोध होता. पक्षात प्रवेश मिळाला असला तरी त्यांना मी उमेदवारी मिळू देणार नाही, असे आव्हान त्यांनी दिले होते.
परंतु चंद्रकांत खैरे यांना कळू न देता जसा अब्दुल रशीद खान मामू यांचा पक्षात प्रवेश झाला, तशीच खैरेंना अंधारात ठेवून मामूंना उमेदवारीही देण्यात आली. यावरून अंबादास दानवे यांनी खऱ्या अर्थाने चंद्रकांत खैरे यांचा 'मामू' केल्याची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात होऊ लागली आहे. 1986 मध्ये संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या वतीने समान नागरी कायद्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चावर अब्दुल रशीद खान यांनी शहरातील एका मशिदीतून दगडफेक केल्याचा आरोप खैर यांनी केला होता.
एवढेच नाही तर आपल्या तक्रारीवरून मामू यांना एक महिना रासुका खाली जेलमध्येही जावे लागले होते. अशा माणसाची पक्षाला गरज काय? अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करत त्यांचा पक्षप्रवेश करवून घेतला. पण मी त्यांना उमेदवारी मिळू देणार नाही, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला होता.
मुलाखतीला शिवसेना भवनात आलेल्या अब्दुल रशीद खान यांना खैरे यांनी भेट नाकारत आपला हिंदुत्ववादी बाणा दाखवला होता. यावर अंबादास दानवे यांनी त्यांच्या उमेदवारीचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असे सांगत या वादापासून स्वतःला दूर ठेवले होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत मामूंचे नाव समाविष्ट होते. यावर चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा अंबादास दानवे यांच्यावर टीका केली. मला अंधारात ठेवून अब्दुल रशीद खान मामू यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप खैरे यांनी केला. मला कुठल्याच उमेदवाराबद्दल सांगण्यात आले नाही, विचारण्यात आले नाही. मी पक्षाचा वरिष्ठ नेता असताना अंबादास दानवे यांनी परस्पर निर्णय घेतले. मला सामनात यादी छापून आल्यानंतरच कळाले. हा माझ्या सारख्या वरिष्ठ नेत्याचा अपमान आहे.
एवढी वर्ष मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, पक्ष वाढवला त्याचे हे फळ म्हणावे लागेल? अशी उद्विग्न प्रतिक्रिया खैरे यांनी व्यक्त केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिका निवडणुकीत व्यस्त आहे.
अब्दुल रशीद खान यांना उमेदवारी ही पक्षप्रमुखांना अंधारात ठेवून देण्यात आली आहे. या शिवाय पक्षात अनेक वर्ष निष्ठेने काम करणाऱ्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांची तिकीटेही अंबादास दानवे यांनी कापली आहे. भाजपला मदत करण्यासाठी त्यांनी असे केले असल्याचा गंभीर आरोपही खैरे यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.