Abdul Sattar With Raosaheb Danve News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar : सत्तारांचा `महोत्सव` संपला, समारोपाला दानवे पिता-पुत्रांची हजेरी..

Marathwada : पाच दिवसीय कृषी महोत्सव आणि वाढदिवसानिमित्त दहा दिवसांचा सिल्लोड महोत्सव असे दुहेरी आयोजन केले होते.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या सिल्लोड मतदारसंघात वाढदिवसानिमित्त भरवलेला दहा दिवसांचा महोत्सव अखेर संपला. मतदारसंघातील नागरिकांसाठी सत्तारांनी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सांस्कृतिक, कव्वाली, मुशायरा, हास्य कलाकार आणि नावाजलेल्या गायकांची गेली दहा दिवस (Sillod)सिल्लोडमध्ये मांदियाळी होती.

१ ते १० जानेवारी दरम्यान हा सिल्लोड महोत्सव घेण्यात आला. आज या महोत्सवाचा समारोप केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,(Raosaheb Danve) भोकरदन-जाफ्राबादचे आमदार संतोष दानवे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आता दरवर्षी असाच सिल्लोड महोत्सव घेतला जाईल, अशी घोषणा देखील (Abdul Sattar) सत्तारांनी केली.

राज्यातील सत्तांतरानंतर अब्दुल सत्तार यांच्यावर राज्याचे कृषीमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम मराठवाड्यात पहिल्यांदा सिल्लोडमध्ये पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवले. पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी मोडीत काढत त्यांनी राज्याचा कृषी महोत्सव सिल्लोडमध्ये आणल्याबद्दल त्यांचे कौतुकही झाले.

पण या महोत्सवाच्या आयोजनासाठी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना प्रेवशिकांच्या माध्यमातून १५ कोटी रुपये वसुल करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप झाल्याने हा कृषी महोत्सव अधिक चर्चेत आला होता. विशेष म्हणजे १ जानेवारी रोजी अब्दुल सत्तारांचा वाढदिवस असतो. त्यामुळे हा योग साधत त्यांनी पाच दिवसीय कृषी महोत्सव आणि वाढदिवसानिमित्त दहा दिवसांचा सिल्लोड महोत्सव असे दुहेरी आयोजन केले होते.

कृषी महोत्सवाचा समारोप राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला होता. तेव्हा देखील सत्तारांनी दरवर्षी सिल्लोडमध्ये कृषी महोत्सव घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज सिल्लोड महोत्सवाची सांगता होत असतांना रावसाहेब दानवे यांच्या साक्षीने त्यांनी हा महोत्सव देखील दरवर्षी घेतला जाईल, अशी घोषणा केली. या दोन्ही महोत्सवाच्या निमित्ताने राजकारण, आरोप-प्रत्यारोप झाले असले तरी शेतकरी आणि मतदारसंघातील हजारो, लोखो नागरिकांनी मात्र या महोत्सवाचा पुरेपूर आनंद लुटला एवढे मात्र खरे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT