Minister Abdul Sattar-Uddhav Thackeray news, Aurangabad Sarkarnma
मराठवाडा

Abdul Sattar : बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले म्हणून कम्युनिस्ट, वंचित जवळ आले..

अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवार लटके यांना कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिला आहे. खरंतर हे नवलच म्हणावे लागेल. (Minister Abdul Sattar)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व त्यांचे चिरंजवी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने कधीच सोडले आहे. म्हणूनच कम्युनिस्ट आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी त्यांच्या जवळ आली आहे, असा टोला राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी ठाकरे सेनेला लगवाला. (Uddhav Thackeray) ठाकरे सेनेतील नेत्यांकडून होत असलेल्या टीकेला आम्ही जशास तसे उत्तर देवू शकतो, पण ते आम्ही करणार नाही. सत्तेतून तडीपार झालेली ही सगळी मंडळी आहे, असा चिमटा देखील त्यांनी काढला.

औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलतांना अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्या (Shivsena) शिवसेनेशी कम्युनिस्ट पक्ष आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीशी वाढती जवळीक यावर भाष्य केले. सत्तार म्हणाले, प्रकाश आंबेडकर कायम शिवसेनेवर टीका करत होते, मग आता त्यांना उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व मान्य आहे, असे का म्हणावे वाटले? हा खरा प्रश्न आहे.

एमआयएम आणि वंचित यांची आघाडी होती, ती तुटल्यामुळे प्रकाश आंबेडकर साहेब उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करण्यास तयार झाले असावेत. त्यांच्या स्वतंत्र पक्ष आहे, ते त्याचे मालक आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, त्यावर आम्ही भाष्य करणे योग्य नाही.

अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवार लटके यांना कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिला आहे. खरंतर हे नवलच म्हणावे लागेल, कारण बाळासाहेब ठाकरे आपल्या संपुर्ण हयातीत कम्युनिस्टांच्या विरोधात होते, पण आज तेच कम्युनिस्ट या पक्षाशी जवळीक साधू पाहत आहेत, त्यांना निवडणुकीत पाठिंबा देत आहेत.

याचे खरे कारण म्हणजे आता पुर्वीची शिवसेना राहिलेली नाही. बाळासाहेबांचे हिंदुत्व त्या पक्षाने सोडले आहे, त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाला ठाकरेंची शिवसेना आपली वाटत असावी. बाळासाहेबांची खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे आणि तेच बाळासाहेबांचा वारसा पुढे चालवतील, असेही सत्तार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT