Abdul Sattar-Rajesh Tope Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar : माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादी फक्त नावालाच, मग फोडाफोडी कशाला करू?

काही लोक लोक दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आधी एमआयएम ही भाजपची बी टीम म्हणून काम करत होती, आता त्यात मनसेची सी टीम म्हणून भर पडली आहे. (Abdul Sattar)

लक्ष्मण सोळुंके

औरंगाबाद : माझ्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेस हा पक्ष फक्त नावाला आहे. या पक्षाची तिथे ताकदच नाही, मग फोडाफोडी कशाला करू, अशा शब्दात शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांना प्रत्युत्तर दिले आहे. औरंगाबादेत काल झालेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या समक्ष टोपे यांनी शिवसेनेचे (Shivsena) मंत्री संदीपान भुमरे आणि सत्तार यांचे नाव घेत हे दोघेही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना धमकावत आहेत, फोडाफोडी करत आहेत, असा आरोप केला होता. (Marathwada)

या आरोपाला विभागीय आयुक्त कार्यालयात प्रसार माध्यमांशी बोलतांना सत्तार यांनी उत्तर दिले. सत्तार म्हणाले, मुळात माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष नावालाच राहिला आहे, त्यामुळे त्यांना फोडण्याचा विषयच येत नाही. राष्ट्रवादी पक्ष 'प्रायव्हेट कॅरियर पार्टी' झाली आहे, त्यामुळे आम्ही कार्यकर्ते फोडण्याचा विषयच येत नाही,आणि असा त्यांचा गैरसमज झाला असेल तर त्या बाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी आम्ही बोलणार आहोत.

काँगेस असो किंवा राष्ट्वादी हे दोन्ही पक्ष ही वाढले पाहिजेत अशी आमची देखील इच्छा असल्याचा चिमटा देखील सत्तार यांनी काढला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजीची सभा व भोंग्याचा मुद्दा म्हणजे बंद झालेले दुकान पुन्हा सुरू करण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचा टोला सत्तार यांनी लगावला. राज ठाकरे यांचे राजकीय दुकान बंद झाले आहे, ते पुन्हा सुरू करण्यासाठीच ते आयोध्येला जात आहेत.

आयोध्येच्या पवित्र भूमीबद्दल त्यांना प्रेम आहे म्हणूनही कदाचित ते जात असतील, असा टोलाही सत्तार यांनी यावेळी लगावला. शिवसेना हाच पक्ष खरा हिंदुत्ववादी आहे, आमचे हिंदुत्व बेगडी नाही, असेही सत्तार म्हणाले. काही लोक लोक दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आधी एमआयएम ही भाजपची बी टीम म्हणून काम करत होती, आता त्यात मनसेची सी टीम म्हणून भर पडली आहे.

एमआयएम मुस्लिमांच्या नावाने राजकारण करते तर हे हिंदूंच्या नावाने करतायेत, असा आरोप देखील सत्तार यांनी केला. आपण लवकरच भाजपाला मोठे खिंडार पाडणार आहोत, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. लवकरच मतदारसंघातील भाजपचे हजारो कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT