Abdul Sattar News Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar News : शिंदेचे सगळे मंत्री, आमदार, खासदार अयोध्येत, सत्तार मात्र बीड दौऱ्यावर...

Shivsena : मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे.

Jagdish Pansare

Marathwada : राज्यातील शिंदे सरकारसाठी आजचा अयोध्या दौरा म्हणजे भाग्याचा क्षण असे सांगितले जाते. (Shivsena) शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या सरकारमधील मंत्री, खासदार, आमदारांचा हा पहिलाच अयोध्या दौरा. त्यामुळे देशभरात या दौऱ्याची चर्चा सुरू आहे. मात्र या दौऱ्यात एक मंत्री नाहीत, ते म्हणजे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार.

राम राम, आदब, सलाम असे म्हणत मतदारांना साद घालणाऱ्या सत्तारांनी मात्र शिंदेंच्या या महत्वाकांक्षी अयोध्या दौऱ्याकडे पाठ फिरवली आहे. (Abdul Sattar) सध्या रमजानचा महिना सुरू असल्यामुळे त्यांनी अयोध्यावारी टाळली असावी, असे बोलले जाते. (Affected Farmers) मात्र त्यांनी राज्यातच थांबून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या भागाला भेटी देण्यासाठी दौरे सुरु केले आहेत.

मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अख्खे मंत्रीमंडळ अयोध्येत असतांना अब्दुल सत्तार मात्र इकडे बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निघाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीने मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर टीका केली आहे.

शेतकऱ्यांपेक्षा मुख्यमंत्र्यांना अयोध्या दौरा महत्वाचा वाटतो का? असा टोला पवारांनी लगावला. त्यानंतर अयोध्या दौऱ्यावर न गेलेल्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना तातडीने अवकाळी व गारपीट झालेल्या भागाचा दौरा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याची चर्चा आहे. तिकडे अयोध्येत सगळे मंत्री, खासदार, आमदार श्रीरामाचे दर्शन घेत असतांना इकडे अब्दुल सत्तार मात्र नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर निघाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT