Abdul Sattar Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad DCC Bank News: समीर सत्तारांचा अर्ज बाद करण्याचं कारण हास्यास्पद; अपिलात आमचा अर्ज शंभर टक्के टिकेल, अब्दुल सत्तारांचा दावा

Chhatrapati Sambhajinagar Politics: जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीने एकत्रित लढावी अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यामुळे मी सर्व गोष्टींची माहिती आणि अभ्यास करून पुढील दिशा ठरवणार आहे, असा सूचक इशाराही सत्तार द्यायला विसरले नाही.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत वेगवान राजकीय घडामोडी घडू लागले आहेत. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. याशिवाय कन्नडच्या आमदार संजना जाधव यांचाही उमेदवारी अर्ज बाद झाला. एकापाठोपाठ एक असे शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज होत असल्याने यामागे काही राजकारण तर नाही ना? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.

दरम्यान, समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला तेव्हा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार हे मुंबईत होते. अर्ज बाद झाल्यानंतर सत्तार यांनी मुंबईतून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी समीर सत्तार यांचा उमेदवारांचा बाद करण्याचे कारण हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. माझा मुलगा हा अद्याप जिल्हा बँकेचा संचालक झालेला नाही, त्यामुळे त्याला नियम 57 लागू होत नाही.

या विरोधात आम्ही अपिलात जाणार आहोत त्यानंतर शंभर टक्के आमचा अर्ज स्वीकारला जाईल असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला. ज्या कारणाने जिल्हा सहनिबंधकांनी समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज बाद केला त्या सोयगाव येथील इमारती मधून जिल्हा बँकेची शाखा स्थलांतरित करावी अशी नोटीस देण्यात आली होती.

परंतु, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने सध्या शेतकरी कर्जमाफी व कर्ज पुरवठा अशी विविध कामे सुरू असल्यामुळे सध्या बँकेची शाखा दुसरीकडे स्थलांतरित करणे शक्य नसल्याचे कळवले होते. नियम 57 हा माझा मुलगा बँकेचा सदस्य असता तर त्याला लागू झाला असता. तर त्याने लाभ उठवला असे म्हणता आले असते. मात्र तसे नसताना नियम 57 अंतर्गत त्याचा अर्ज बाद करणे हास्यस्पद आहे.

आम्ही या निर्णयाविरोधात अपील करणार आहोत त्यानंतर समीर सत्तार यांचा अर्ज 100% स्वीकारला जाईल याची मला खात्री असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. या सर्व प्रकारामागे काही राजकारण आहे का या प्रश्नावर मात्र सत्तार यांनी सावध भूमिका घेत मी यावर सध्या काहीही बोलणार नाही असे स्पष्ट केले.

जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीने एकत्रित लढावी अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यामुळे मी सर्व गोष्टींची माहिती आणि अभ्यास करून पुढील दिशा ठरवणार आहे, असा सूचक इशाराही सत्तार द्यायला विसरले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT