सिल्लोड : सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे जनसंवाद पदयात्रा व विराट जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
गेल्या पाच वर्षात मतदारसंघात विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला. विरोधकांकडे माझ्या विरोधात बोलण्यासाठी कुठलाच मुद्दा नसल्याने खोटे आरोप करून ते केवळ बदनामी करत आहेत, असे सत्तार म्हणाले.
मतदारसंघात शासनाच्या योजना व विकासकामे करताना गावांतर्गत रस्ते, सिंचन, शिक्षण, आरोग्य, शेतकऱ्यांच्या मालाच्या सुरक्षेसाठी शीतगृह, रोजगार निर्मितीसाठी उद्योग आणि पाणीपुरवठा आदी विकास योजनांच्या माध्यमातून सुरू असलेली कामे तसेच मतदारांशी माझी जुळलेली नाळ, त्यांच्याशी असलेले अतुट नाते आणि जनसंपर्काच्या बळावर मी मतदारांची मने जिंकलेली आहे, असेही ते म्हणाले.
मतदारसंघातील चौफेर विकास पाहून पाच वर्षांपासून मतदारसंघातील कोणत्याच गावात न आलेल्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता जातीपातीचे राजकारण आणि दिशाभूल करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही. त्यामुळे अशा लोकांपासून सावध रहा व सुरू असलेला विकास कायम ठेवण्यासाठी येणाऱ्या २० तारखेला धनुष्यबाण लक्षात ठेवा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार आमदार अब्दुल सत्तार यांची मतदारांना केले. या प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.