Minister Abdul Sattar-Uddhav Thackeray news, Jalna Sarkarnma
मराठवाडा

Abdul Sattar : शिंदेंना आम्ही नेता म्हणून निवडले आहे , त्यांच्याशी जुळवून घ्या, एकत्र या..

पुढची शिवसेना ही धनुष्यबाणासह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच असेल असा विश्वास देखील सत्तार यांनी व्यक्त केला. (Minister Abdul Sattar)

उमेश वाघमारे

जालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राष्ट्रीय नेते म्हणून निवड केली आहे. त्यामुळे आता शिंदे यांच्याशी जुळवून घेऊन शिंदे यांच्या छत्रछायेत एका भगव्या खाली एकत्र येत त्यांना नेता मानावे, असा सल्ला कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता त्यांना दिला. शिंदे गट शिवसेनेच्या हिंदूगर्वगर्जना मेळाव्यासाठी जालन्यात सत्तार आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

सत्तार म्हणाले, की मागील अडीच वर्ष मी अन्‌ माझ्या कुटूंबाची जबाबदारी त्यांनी पार पडली. परंतु, याच काळात शिवसैनिकांचे हाल झाले. (Eknath Shinde) २०१९ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेने एकत्र मते मागितली. परंतु, नेत्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून तीन चाकी सरकार स्थापन केले. त्यामुळे ज्या पक्षासोबत आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्यासोबतच बसण्याची वेळ शिवसैनिकांवर आणली होती.

त्यामुळे शिवसेना वाचविण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ही जबाबदारी घ्यावी लागली. आज शिवसेना-भाजपची खरी युती झाली असून अल्प कालावधीत आठशे शासन निर्णय काढले गेले आहेत. मुख्यमंत्री शिंदे आज प्रत्येकाला भेटत आहेत. पूर्वी आम्हा मंत्र्यांना कोणी भेटत नव्हते. आता मुख्यमंत्री शिंदे सर्वांना भेटतात हे पाहिल्यानंतर तेही शाखेपर्यंत जात आहेत.

मागील अडीच वर्ष ते गावापर्यंत जरी गेले असते, तर ही वेळ आली नसती. आमच्याकडे बहुमत असून मुख्यमंत्री शिंदे यांना राष्ट्रीय नेते म्हणून आम्ही निवडले आहे. त्यामुळे आता शिंदे यांच्याशी जुळवून घेऊन त्यांच्या छत्रछायेत एका भगव्या खाली ज्यांना हिंदूत्ववाद पटत असेल त्यांनी यावे. शिंदे यांना नेता मानावे, असे आवाहन देखील सत्तार यांनी केले. पुढची शिवसेना ही धनुष्यबाणासह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच असेल असा विश्वास देखील सत्तार यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT