Abdul Sattar
Abdul Sattar  Sarkarnama
मराठवाडा

अब्दुल सत्तारांची जीभ घसरली; सुप्रिया सुळेंबाबत गलिच्छ भाषेत टीका

अनुराधा धावडे

औरंगाबाद : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची खासदार सुप्रिया सुळेंबाबत बोलताना जीभ घसरली आहे. त्यांच्या या टीकेनंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, सत्तारांनी चोवीस तासाच्या आत शब्द मागे घ्यावेत, अन्यथा त्याची जीभ हासडू, असा इशारा अमोर मिटकरी यांनी दिला आहे.

सिल्लोडमध्ये बोलताना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही गलिच्छ भाषेत टीका केली आहे. सुप्रिया सुळेंना तुम्ही खोके देण्याची ऑफर केली होती. त्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं, यावर काय सांगाल असं सत्तार यांना पत्रकाराने प्रश्न विचारला. या वर बोलताना सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं.

इतकचं नव्हे तर, यानंतरही त्यांना त्यांच्या वक्तव्याचा कोणताही पश्चातापही झालेला दिसत नाही. त्यांच्या या टीकेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरहीर पुन्हा एकदा सत्तार यांनी "ते आम्हाला खोके बोलू लागले, आमचे खोके आणि त्यांचे डोके तपासावे लागेल, ज्यांचे डोके तपासावे लागेल खोक्याची आठवण येऊ लागली आहे त्यांच्यासाठी सिल्लोडमध्ये दवाखाना उघडावा लागेल. त्या दवाखान्यात खोके खोके बोलतात त्यांचे डोके तपासावे लागले. हे भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो", अशा शब्दांत सत्तारांनी पुन्हा सुप्रिया सुळेंबाबत गलिच्छ भाषेत टीपण्णी केली आहे.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांना शब्द मागं घेण्याचा इशारा दिला आहे. चोवीस तासात तासात अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी, अन्यथा त्याची जीभ हासडू, असा इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रमाणे महिलांचा सन्मान केला तीच शिकवण राष्ट्रवादीनेही आम्हाला दिली आहे. पण सत्तेचा माज असलेले कृषी मंत्र्यांची वेळ पडली तर मीही सत्तांराना एकेरी आणि अपशब्द बोलू शकतो. पण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. माही पातळी ओलांडू शकतो. पण ते अजित दादा, पवार साहेब आणि सुप्रिया ताईंना पटणार नाही म्हणून मी संयमाने बोलत आहे. त्यामुळे त्यांनी चोवीस तासात तासात अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT