Satish Chavan With Pawar News Sarkarnama
मराठवाडा

Satish Chavan With Pawar News : काल गैरहजर, आज सत्काराला हजर ; चव्हाण, काळे अजित पवारांसोबतच..

Ncp : चव्हाण, काळे हे दोघे विधान परिषदेवर आमदार असल्यामुळे त्यांना स्थानिक व जिल्हा पातळीच्या संघटनेत फारसा रस नसायचा.

सरकारनामा ब्युरो

Marathwada Ncp: मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण तसेच मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे हे दोघेही अजित पवारांसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे (Satish Chavan With Pawar News) सतीश चव्हाण कालच्या शपथविधी सोहळ्याच्या वेळी शहरातच होते. विक्रम काळे मुंबईत असल्याने त्यांनी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली आणि नंतर आपण अजित पवार यांच्यासोबतच असल्याचे जाहीरही केले.

सतीश चव्हाण मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीमुळे शहरात होते, मात्र ही निवडणूक बिनविरोध होताच ते रात्री मुंबईला रवाना झाले. (Ncp) आज अजित पवारांच्या सत्कार सोहळ्यात चव्हाण हिरारीने सहभागी झाल्याचे पहायला मिळाले. पहाटेच्या शपथविधी सोहळ्याच्या वेळी सतीश चव्हाण हे अजित पवारांच्या खांद्याशी खांदा लावून उभे होते. (Marathwada) काल मात्र ते शपथविधी सोहळ्याला न दिसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

चव्हाण यांच्या तीन टर्म आमदार तसेच विक्रम काळेंच्या हॅट्रीकमध्ये अजित पवारांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे शरद पवारांबद्दल आदर असला तरी पुढील राजकीय इनिंगसाठी मराठवाड्यातील या दोन्ही आमदारांनी अजित पवारांच्या नेतृत्वावरच विश्वास दाखवला आहे. (Aurangabad) चव्हाण, काळे हे दोघे विधान परिषदेवर आमदार असल्यामुळे त्यांना स्थानिक व जिल्हा पातळीच्या संघटनेत फारसा रस नसायचा.

मुंबईहून राष्ट्रवादीचे मोठे नेते आले तरच ते सोबत दिसायचे. इतरवेळी मात्र ते फारसे पक्षाच्या कार्यक्रमात फारसे दिसत नव्हते. त्यामुळे ते अजित पवारांसोबत गेल्याने मुळ राष्ट्रवादीला जिल्ह्यात आणि मराठवाड्यात फारसा फरक पडणार नाही. या दोघांचेही कार्य हे आपापल्या कार्यक्षेत्रापुरतेच मर्यादित होते. त्यामुळे पक्षाने देखील आतापर्यंत त्यांच्यावर संघटनात्मक मोठी जबाबदारी टाकली नव्हती.

तीन टर्म दोघेही आमदार असून त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. या उलट उदगीर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या संजय बनसोडे यांना दुसऱ्यांदा मंत्रीपदाची लाॅटरी लागली. पण चव्हाण-काळे जोडी मात्र मंत्रीपदापासून अजूनही दूरच आहे. सध्याच्या सरकारमध्ये देखील त्यांना संधी मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे अजित पवारांसोबत जावून देखील या दोघांना फारसा फायदा होणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT