Shivsena UBT News : शनिवारी (१४ ऑक्टोबर) मध्यरात्री समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात ६ वर्षांच्या एका चिमुकल्यासह १२ जण जागीच ठार झाले. (Accident News) बुलडाण्याहून नाशिकला जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली आणि या अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलमधील ३५ पैकी २३ जण जखमी झाले आहेत.
या अपघातावरून आता राजकारण सुरू झाले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा अपघात मानवनिर्मित असल्याचा गंभीर आरोप करत यासाठी आरटीओला दोषी धरले आहे. (Shivsena) या संदर्भात अंबादास दानवे यांनी `एक्स`वर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Samrudhi Mahamarg) इंटरचेंजवरील टोल नाका क्रॉस करून समृद्धी महामार्गाला लागण्यापूर्वी प्रादेशिक परिवहन विभागाच्या लोकांनी वाहनांची तपासणी करणे आवश्यक आहे.
रात्री भर महामार्गावर ट्रक आरटीओच्या टीमने थांबवला म्हणून मागून येणारी मिनीबस या ट्रकवर आदळली. हा मानवनिर्मित अपघात आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. समृद्धी महामार्ग हा आता धंद्याचा महामार्ग बनला असून, जे आरटीओ अधिकारी त्यावेळी अपघातस्थळी कर्तव्यावर होते, त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. (Marathwada) अशावेळी भर महामार्गावर गाडी थांबवणं चुकीचं आहे, तसं क्षमतेपेक्षा अधिक लोक बसवून नेणेही चुकीचच आहे, असेही दानवे यांनी म्हटले आहे.
समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जातो, परंतु जेव्हापासून हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला तेव्हापासून सुरू असलेली अपघातांची मालिका काही केल्या थांबताना दिसत नाही. राज्य सरकारने अनेक उपाययोजना करून अपघातांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांत समृद्धीवरील अपघातांचे प्रमाण कमीही झाले होते. याबद्दल समाधान व्यक्त करत नाही, तोच काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर परिसरात हा भीषण अपघात झाला.
दरम्यान, या अपघातातील मृतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी यासंबंधी पोस्ट सोशल मी़डियावर शेअर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या अपघाताने दु:ख झालं. आपले नातेवाईक गमावलेल्यांसोबत मी आहे. लवकरात लवकर जखमी झालेल्या व्यक्ती बऱ्या व्हावेत, अशी इच्छा आहे. मृतांच्या नातेवाइकांना २ लाखांची मदत देण्यात येईल, तर जखमींना ५० हजारांची मदत दिली जाईल. ही मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.