MP Imtiaz Jaleel News Sarkarnama
मराठवाडा

MP Imtiaz Jaleel News : आदर्शच्या कर्जदारांची जप्त मालमत्ता खरेदीचा निर्णय सहकार आयुक्त घेणार का ?..

Jagdish Pansare

Adarsh Society Scam : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्यात हजारो ठेवीदारांच्या कष्टाचा पैसा अडकला. २०२ कोटींच्या या घोटाळ्याने ठेवीदारांची दिवाळी अंधारात जाण्याची वेळ आली आहे. (Scams News) ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी सरकारकडून सुरू असलेले प्रयत्नांनाही यश मिळताना दिसत नाही. आदर्शच्या काही संचालक व बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय झाला.

पण त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने सहकार विभागाच्या अडचणी आणखी वाढल्या. (Scams) मालमत्ता विक्रीसाठीच्या लिलावाला प्रतिसाद मिळत नसल्याने ही मालमत्ता शासनानेच खरेदी करावी आणि ठेवीदारांना दिवाळीपूर्वी त्यांचे पैसे परत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी पुन्हा केली आहे.

यापूर्वी त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनाही पाठवले. (AIMIM) आता बड्या कर्जदारांची जप्त केलेली संपत्ती शासनानेच खरेदी करावी, यासाठीचा प्रस्ताव इम्तियाज जलील यांनी सहकार विभागाकडे दिला आहे.

ताडीने यावर कार्यवाही करून ठेवीदारांना त्यांचे पैसे दिवाळीपूर्वी द्या, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी आदर्श मालमत्ता शासनाने स्वत: खरेदी करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकारी मा. सहकार आयुक्त व निबंधक, पुणे यांना असल्याने त्यांना सविस्तर प्रस्ताव विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत पाठवण्यात आला आहे. आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांनाही दिवाळीचा सण उत्साहात साजरा करता यावा, यासाठी शासनाने आदर्श पतसंस्थेची जप्त केलेली मालमत्ता स्वत: खरेदी करण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा, अशी मागणीही इम्तियाज जलील यांनी पुन्हा केली आहे.

दरम्यान, आदर्श पतसंस्थेतील पन्नासहून अधिक कर्जदारांचे कर्ज महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत वर्ग करण्यासंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली. यात काही कर्ज वर्ग करून घेण्याची तयारी महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने दर्शवल्याची माहिती आहे. लवकरच याची प्रक्रिया पूर्ण होऊन कर्ज वसूल होण्यास मदत होणार आहे. सहा महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या आदर्श पतसंस्थेमध्ये २०२ कोटींचा घोटाळा झाला. चाळीस हजारांहून अधिक ठेवीदारांच्या रकमा यात गुंतल्या आहेत. शहरात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महिनाभरात ठेवी परत देण्याची कार्यवाही सुरू केली जाईल, असे आश्वासन दिले होते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT