Shivsena Leader Aditya Thackeray
Shivsena Leader Aditya Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Aditya Thackeray : जगात जर्मनी नाही आता परभणी, अशी ओळख निर्माण करायची आहे ...

सरकारनामा ब्युरो

परभणी : जगात जर्मनी अन् देशात परभणी ही म्हण आहे, पण आपल्याला ती बदलून सोपी करायची आहे. (Parbhani) परभणीच्या कृषी विद्यापीठात निर्माण होणाऱ्या सायन्स पार्कमधून भविष्यात इथले तरून मला जगाच्या पातळीवर पोहचलेले पहायचेत. संशोधन क्षेत्र, नासा, डीआरडीओ, इस्त्रो अशा सगळ्या ठिकाणी आपल्या मराठवाड्यातला, परभणीतला तरूण पोहचेल असे काम आपल्याला करायचे आहे.

त्यामुळे आता जगात जर्मनी अन् देशातर परभणी ही म्हण आपल्या बदलून टाकायची आहे. यापुढे जगात परभणी म्हणून आपली ओळख निर्माण करूयात, असा विश्वास राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी व्यक्त केला. परभणीच्या वंसतराव नाईक मराठवाडा (Marathwada) कृषी विद्यापीठात उभारण्यात येणाऱ्या सायन्स पार्कचे भुमीपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार संजय जाधव, आमदार डाॅ. राहुल पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले, एस्ट्रोनॉमी आणि एस्ट्रोलॉजी याचा विचार करून एखादे सायन्स पार्क परभणीच्या या कृषी विद्यापीठात व्हावे, असा विचार जेव्हा आमदार राहुल पाटील यांनी केला आणि तशी इच्छा माझ्याकडे व्यक्त केली तेव्हा मी तातडीने होकार दिला.

आकाशात दिसणारे चंद्र तारे पाहून आपण तिथे पोहचू शकतो का? तिथे पाणी असेल का? असा प्रश्न विद्यार्थांना पडला पाहिजे. आठवी ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याबद्दल आकर्षण आणि उत्सूकता यातून निर्माण झाली पाहिजे. यातूनच भविष्यात मोठे संशोधक, अभ्यासक तयार होतील आणि ते देशाच्या नाही तर जगाच्या पातळीवर चमकतील.

त्यामुळे या सायन्स पार्कसाठी जेवढा निधी लागेल तो आम्ही उपलब्ध करून देवू. यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी देखील बोलणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. समोर बसलेले हे विद्यार्थी जेव्हा पाच वर्षांनी मतदान करतील तेव्हा आमच्यासाठी तुम्ही काय केले ? हा प्रश्न निश्चित विचारतील.

परभणीच्या सायन्स पार्कमध्ये शिकून बाहेर पडलेला विद्यार्थी मला जगात पोहचलेला पहायचा आहे. स्वतःच्या फायद्यासाठी नको त्या विषयाला हात घालणारे आणि राजकीय नेते, पक्ष आहेत. पण विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करणारे थोडेच असतात, असे म्हणत त्यांनी आमदार राहुल पाटील यांचे कौतुक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT