Chhatrapati Sambhajinagar Market Committee News Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar Market Committee News : माजी सभापतीच्या आक्षेपानंतर प्रशासकाचा अर्ज फेटाळला..

Farmers : काळे यांच्या नावावर बाजार समितीत दुकान, गाळे असल्याने त्यांना सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढविता येत नाही.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीतच्या (Market Committee) निवडणुकीत काल उमेदवारी अर्ज छानणीत नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. भाजपचे माजी सभापती राधाकिशन पठाडे यांनी महाविकास आघाडीचे माजी प्रशासक जगन्नाथ काळे यांनी एकमेकांच्या अर्जावर आक्षेप घेतले होते. त्यामुळे यावरील निकाल राखीव ठेवण्यात आला होता.

यावर आज निवडणुक निर्णय अधिकारी मुकेश बारहाते यांनी सभापती पठाडे यांचा आक्षेप मान्य करत प्रशासक जगन्नाथ काळे यांचा अर्ज बाद ठरवला. (Aurangabad) या निर्णयाविरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले. (Marathwada) दरम्यान, २२२ अर्जांपैकी १९ बाद झाले असून १८१ वैध ठरले आहेत.

छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या प्रक्रियेत बुधवारी (ता.५) दाखल झालेल्या २२२ नामनिर्देशन पत्रांची बाजार समिती मधील शेतकरी भवनात छाननी प्रक्रिया राबविण्यात आली. या उमेदवारी अर्ज छाननीत माजी सभापती राधाकिसन पठाडे आणि माजी प्रशासक जगन्नाथ काळे यांनी एकमेकांच्या अर्जावर आक्षेप घेतला.

यावर बराच वेळ सुनावणी सुरु होती, दोन्ही बाजूंनी करण्यात आलेल्या युक्तीवादानंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते यांनी निकाल राखिव ठेवला. (Bjp) आज गुरुवारी (ता.६) सकाळी अकरा वाजता या आक्षेप अर्जावर निर्णय जाहिर करण्यात आला. बारहाते यांनी जगन्नाथ काळे यांचा अर्ज फेटाळल्याचे जाहीर केले.

राधाकिशन पठाडे हे विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरीभाऊ बागडे यांचे कट्टर समर्थक आहेत, तर जगन्नाथ काळे हे काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डाॅ. कल्याण काळे यांचे बंधू आहेत. माजी सभापती राधाकिसन पठाडे यांच्या उमेदवारी अर्जांवर माजी प्रशासक जगन्नाथ काळे यांनी आक्षेप घेतला होता.

बाजार समितीत पठाडे यांनी भ्रष्टाचार केला असून त्यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरवावे ,अशी लेखी मागणी त्यांनी केली. यावर जगन्नाथ काळे यांचा अर्ज छाननी सुरु असताना पठाडे यांनी ते व्यापारी असून त्यांच्या नावावर बाजार समितीत दुकान, गाळे असल्याने त्यांना सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढविता येत नाही, असा लेखी आक्षेप नोंदवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT