Mla Meghna Bordikar
Mla Meghna Bordikar Sarkarnama
मराठवाडा

प्रधानमंत्री अवास योजनेला ग्रहण ; प्रशासनाच्या विरोधात भाजप आमदाराचे उपोषण

सरकारनामा ब्युरो

परभणी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी योजनेपैकी एक असलेली प्रधानमंत्री आवास योजनेला परभणी जिल्ह्यात मात्र गृहण लागले आहे. (Bjp) लाभार्थ्यांना घरकुल मिळत नसल्याने भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावरच उपोषण सुरू केले. (Parbhani)

जिल्हाधिकारी कार्यलयासमोर शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी उपोषण सुरू केले. परभणी जिल्हा परिषदेच्या गलथान कारभारामूळे जिल्ह्यातील हजारो लाभार्थी योजनेपासून वंचित राहिले आहेत. लाभार्थ्यांची नावे काढून राजकारण करून भ्रष्टाचार करण्यात येत असल्याचा आरोप देखील बोर्डीकर यांनी केला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सालगडी झाले आहेत, असा हल्लाबोल देखील बोर्डीकर यांनी केला आहे. मराठवाडा व राज्यात आज विविध ठिकाणी आंदोलन, उपोषणे करण्यात आली. प्रजासत्ताक दिन असूनही आंदोलने सुरू असल्याचे पहायला मिळाले.

बीड, हिंगोलीत आत्मदहन, झाडावर चढून आंदोलनाचे प्रकार समोर आले. परभणीत देखील भाजपने पंतप्रधान आवास योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नसल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी उपोषणाचे हत्यार उपसले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील या आंदोलनाला मोठी गर्दी झाली होती.

आमदार मेघना बोर्डीकर या देखील उपोषणाला बसल्या. त्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवत पंतप्रधान आवास योजनेच्या कामात देखील राजकारण केले जात असून योजनेपासून खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेवले जात असल्याचा आरोप केला. योजनेत खोडा घालणाऱ्या संबंधित आधिकाऱ्यांवर कारवाई करून, लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्या, अशी मागणी देखील बोर्डीकर यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT