Central Minister Dr.Bhgwat Karad
Central Minister Dr.Bhgwat Karad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : केंद्रात मंत्री झाल्यानंतर डाॅ.कराडांचा मुळ गावी चिखलीत होणार सत्कार..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी दिल्लीत मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मुळ गावी फटाक्यांची जोरदार आतषबाजी व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. (Aurangabad) परंतु आपल्या गावाचा लौकिक थेट दिल्लीत वाढवणाऱ्या करांडाचा सत्कार करण्यासाठी गावकऱ्यांना अनेक महिने वाट पहावी लागली.

मंत्री झाल्यानंतर लगेचच कराड यांच्यावर मराठवाड्यात (Marathwada) यात्रेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. (Dr.Bhagwat Karad) शिवाय अर्थ राज्यमंत्री पदाची महत्वाची जबाबदारी असल्याने कराड कायम दिल्ली दौऱ्यावर असतात. (Bjp) त्यामुळे गावकऱ्यांचा हट्ट त्यांना पुरवता आला नव्हता. परंतु आता कराड यांनी वेळ दिल्यामुळे मंत्री झाल्यानंतर गावात त्यांच्या पहिला सत्कार उद्या, २० मे रोजी होणार आहे.

या सत्काराची जय्यत तयारी गावकऱ्यांनी सुरू केली आहे. एका सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा देशाच्या राजकारणात उच्च पदावर पोहचल्याचा गावकऱ्यांचा आनंद या सत्काराने द्विगुणीत होणार आहे. डाॅ. कराड यांचे मुळगाव हे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील चिखली हे आहे. चिखली ते दिल्लीपर्यंतच्या कराड यांच्या यशस्वी राजकीय वाटचालीत गावातील अनेक शिलेदारांचा देखील वाटा आहे.

या सत्काराचे आयोजन बालाजी चाटे, सदाशिव जाधव यांनी केले असून अख्खे गावच तयारी लागल्याचे चित्र आहे. अशोक चाटे ,चिखली गावचे सरपंच संभाजी गायकवाड, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संग्राम चामे, लक्ष्मीबाई चाटे, सुलोचना गोपले हे देखील सोहळ्यासाठी परिश्रम घेत आहेत. पाच हजार गावकऱ्यांच्या उपस्थीत हा नागरी सत्कार सोहळा होणार आहे.

डॉक्टर भागवत कराड यांचे प्राथमिक शिक्षण हे चिखली गावातच पूर्ण झाले, त्यानंतर माध्यमिक शिक्षण चिखली पासून पाच किलोमीटर असलेल्या अदुरी येथील माध्यमिक शाळेत झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते अहमदपूरला गेले. या महाविद्यालयाचे ते पहिले विद्यार्थी आहे ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला .या निमित्ताने गावातील समस्या सुटतील आणि विकासकामाला गती येईल, असा विश्वास उपसरपंच बालाजी चाटे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT