Raju shetti
Raju shetti  Sarkarnama
मराठवाडा

Raju Shetti: तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज; शेट्टी शिंदे सरकारवर बरसले,म्हणाले..

सरकारनामा ब्यूरो

Raju Shetti On Ravikant Tupkar : राज्यातील कापूस आणि सोयाबीनच्या दरवाढीसह पीकविमा अतिवृष्टीची नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा आक्रमक होत राज्य सरकारला आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावेळी तुपकर हे वेशांतर करुन बुलढाणा येथे शनिवारी(दि.११) स्वाभिमानीच्या आंदोलनात सहभागी झाले.

त्यानंतर तुपकर त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. यानंतर आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठी चार्ज करण्यात आला.यावरुनच आता माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Swabhimani Shetkari Sanghtana agitation)

राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनावरुन सरकारला सडकून टीका केली आहे. शेट्टी म्हणाले, सोयाबीन, कापसाला भाव मागणाऱ्या शेतकरी आंदोलनकर्त्यांवर लाठ्या काठ्या चालवता, त्यांच्यावर पोलिसी बळाचा वापर करता. जनरल डायरनं जन्माला घातल्यागत शेतकऱ्यांच्या बाबतीत पोलीस वागत आहेत असा आरोप शेट्टी (Raju Shetti) यांनी यावेळी केला आहे.

तसेच राज्यकर्त्यांना मला एवढंच सांगायचे आहे की, तुम्ही कितीही लाठ्या काठ्या घाला, शेतकरी मागे हटल्याशिवाय राहणार नाही. हा बळीराजा तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकरांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करुन जर त्यांना वेठीस धराल तर हे अत्यंत चुकीचं आहे. भविष्यात एक दिवस तुम्हांला याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांचं अन्नत्याग आंदोलन पुकारलं असून पोलीस कोठडीतही त्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे.

तुपकरांचा गनिमी कावा....

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना गनिमी कावा करत वेशांतर करुन चोख पोलीस बंदोबस्त व ठिकठिकाणी होणारी तपासणी चुकवत आंदोलनात सहभागी झाले.यावेळी तुपकरांनी पाण्याच्या बाटलीमधील डिझेल अंगावर ओतून घेतले. पुढे जाणाऱ्या तुपकरांनी मग जिल्हा कार्यालयासमोर ठिय्या मांडला.

दरम्यान, मागण्यासंदर्भात ठोस निर्णय होईपर्यंत येथून हटणार नाही असा इशारा तुपकर यांनी दिला आहे. अद्यापही तुपकर आणि त्यांचे शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत.

कापसासह सोयाबीन आणि पीक विम्याच्या प्रश्नांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले होते. गेल्या तीन दिवसांपासून ते भूमिगत झाले होते. पोलिसांकडून त्यांची शोधाशोध देखील सुरु होती. सरकारला 10 फेब्रुवारीचा अल्टिमेटम दिला होता. तो अल्टिमेटम संपल्यानंतर तुपकर यांनी पोलीस वेशात येत अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे तुपकरांना आत्महदनापासून रोखण्यात यश आलं.परंतू ,या घटनेनंतर परिसरात काहीवेळ मोठा तणाव निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT