Dhananjay Munde News Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde News: धनंजय मुंडेंचा ताफा मध्यरात्री पोचला दवाखान्यात...

Swami Ramanand Theertha Rural Medical College and Hospital:धनंजय मुंडे यांनी अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत त्यांना धीर दिला.

Datta Deshmukh

Ambajogai : मुंबईवरून छत्रपती संभाजीनगर मार्गे बीडवरून महाशिवरात्रीसाठी परळीकडे निघालेले राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे अचानक मध्यरात्री अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात येऊन पोहोचले. परळी मतदारसंघातील निरपणा या गावातील काही जणांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आणि धनंजय मुंडे यांनी आपला ताफा थेट परळीऐवजी अंबाजोगाईकडे वळविला. रुग्णांची भेट घेऊन मुंडेंनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. येथील डॉक्टरांना चांगले उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मध्यरात्री 12 वाजण्याच्या आधी जाऊन शिवरात्रीनिमित्त परळी येथील प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घ्यायचे या हेतूने परळीच्या दिशेने निघाले असता धनंजय मुंडे यांना निरपणा गावातील काही जणांना विषबाधा झाल्याचे वृत्त समजले, त्याबरोबर त्यांनी आपला ताफा अंबाजोगाईकडे वळवला. अगोदर मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत दर्शन घेणे पुढे ढकलले.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे जाऊन निरपणा गावातील अन्नातून विषबाधा झालेल्या सर्वच रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत त्यांना धीर दिला, त्यांच्यावर तातडीने योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित डॉक्टरांना दिल्या. सदर रुग्णांना भगरीतून विषबाधा झाली असल्याने याबाबत योग्य चौकशी करण्याचेही निर्देश धनंजय मुंडे यांनी अन्न भेसळ व सुरक्षा अधिकारी देवरे यांना दूरध्वनीवरून दिले.

या वेळी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी. अधिष्ठाता डॉ. मोगरेकर, डॉ. धपाटे, डॉ. मोगरेकर, डॉ. चव्हाण, तानाजी देशमुख, विश्वंभर फड, रणजित लोमटे, अजित गरड यासह आदी उपस्थित होते. सर्वच रुग्णांची प्रकृती आता स्थिर असून, डॉक्टर योग्य ते उपचार करत असल्याचे अधिष्ठाता डॉ. मोगरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT