Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde On Onion Issue : कांदा निर्यातीवरील शुल्कवाढीस कृषिमंत्री मुंडेंचा विरोध; म्हणाले ‘मी उद्याच दिल्लीला जातोय...’

Onion Export Stamduty : कांदा निर्यातीवरील ४० टक्के शुल्क हे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra onion News : कांदाच्या निर्यातीवर लावण्यात आलेले ४० टक्के शुल्काच्या विरोधात खुद्द राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे उतरले आहेत. कांदा निर्यातीवरील ४० टक्के शुल्क हे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. मी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या भेटीची वेळ घेतली आहे. मी उद्याच दिल्लीला जातोय. गोयल आणि तोमर यांना भेटून कांदा निर्यातीवरील शुल्क कमी करण्याची विनंती करणार आहे, असे मुंडे यांनी सांगितले. (Agriculture Minister Dhananjay Munde's opposition to increase in duty on onion export)

देशातील कांद्याची वाढती किंमत रोखण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले आहे. त्याचे तीव्र पडसाद रविवारपासून (ता. २० ऑगस्ट) राज्यात उमटत आहेत. नाशिकमधील सर्व बाजारपेठा आज (ता. २१ ऑगस्ट) बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडेंनी ही माहिती दिली.

कृषिमंत्री म्हणाले की, कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले ४० टक्के शुल्क हे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. मी उद्या (मंगळवारी, ता. २२ ऑगस्ट) सकाळचाच वेळ केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांचा घेतला आहे. तसेच, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनाही मी उद्या भेटणार आहे. मी स्वतः राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने कृषिमंत्री म्हणून मी त्यांना निर्यात शुल्क कमी करण्यासाठी विनंती करणार आहे.

शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळणारा बाजारभाव खाली आला नाही पाहिजे. त्यासंदर्भातील चर्चा रविवारीच मी पियूष गोयल यांच्यासोबत केली आहे. त्यानंतर मी स्वतः उद्या दिल्लीला पियूष गोयल यांना भेटायला जातोय, असेही कृषिमंत्री मुंडे यांनी सांगितले.

धनंजय मुंडे म्हणाले की, मी राज्यातील शेतकऱ्यांना विनंती आहे की, हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कांद्याच्या या प्रश्नांवर उद्या माझी पियूष गोयल यांच्याशी सविस्तर चर्चा होणार आहे, भाव पडणार नाही, याची काळजी केंद्र आणि राज्य सरकार म्हणून आम्ही घेऊच, या गोष्टींचा मी राज्याचा कृषिमंत्री म्हणून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विश्वास देतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT