Guardian Minister Atul Save News, Beed Sarkarnama
मराठवाडा

Affected Farmers News : कृषीमंत्री येवून गेले, विरोधी पक्षनेतेही येणार, पालकमंत्री सावेंना मात्र वेळ मिळेना..

Marathwada : पालकमंत्र्यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडला की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

सरकारनामा ब्युरो

Beed District : बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागात पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) येवून गेले, आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र पालकमंत्री अतुल सावे यांना मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वेळ मिळत नाहीये. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्य मंत्रीमंडळाचा रखडलेला विस्तार, त्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांची न झालेली नियुक्ती याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. (Beed News) एका मंत्र्याकडे अनेक जिल्ह्यांचे पालकत्व असल्याने त्यांना पुरेसा वेळ देता येत नाहीये. ही वस्तुस्थिती असली तरी राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्या छत्रपती संभाजीगर पुर्व मतदारसंघापासून फक्त १२० किलोमीटरवर असलेल्या व त्यांच्याकडे पालकमंत्री म्हणून जबाबदारी असलेल्या बीड जिल्ह्यात देखील त्यांना जायला वेळ मिळत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस बीड जिल्ह्याच्या अनेक भागात गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. एवढेच नाही तर गोठ्यांची पडझड, जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांना (Affected Farmers) तातडीने मदतीची गरज आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अख्खे मंत्रीमंडळ अयोध्येत गेले असतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी बीड जिल्ह्याचा दौरा करत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती.

शेतकऱ्यांना दिलासा देत तातडीने मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे बीड आणि केज तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेटी देवून पाहणी करणार आहेत. असे असतांना पालकमंत्री अतुल सावे मात्र अद्याप बीडकडे फिरकलेले नाहीत. पालकमंत्र्यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडला की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT