Mla Prashant Bamb In Winter Session News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Prashant Bamb : कृषीमंत्री साहेब, माझ्या मतदासंघातले मका संशोधन केंद्र पळवू नका..

Nagpur : शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेला वर्षानुवर्ष सत्ता असणारे काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार त्यांचे नेते जबाबदार आहेत.

सरकारनामा ब्युरो

Winter Session News : भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी आपल्याच सरकारमधील राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे मतदारसंघात मंजुर झालेले मका संशोधन केंद्र पळवू नका, अशी विनंती केली आहे. तुम्ही (Agriculture Minister) कृषीमंत्री आहात, राज्यातला कोणताही प्रकल्प, योजना तुमच्या मतदारसंघात नेवू शकता, आमची काही हरकत नाही. लागली तर आम्ही तुम्हाला मदतच करू.

पण माझ्या मतदारसंघात मंजुर झालेले मका संशोधन केंद्र तेवढे दुसरीकडे हलवू नका, अशा शब्दात आमदार प्रशांत बंब यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना चिमटा काढला. प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी सभागृहात आज आक्रमक भाषण केले. फडणवीस सरकारच्या काळात मंजुर झालेली मराठवाडा वाॅटर ग्रीड, करोडी येथे होणारे क्रिडा विद्यापीठ, वाळुज जवळीच आंतरराष्ट्रीय क्रिडांगण या सगळ्या मंजुर झालेल्या गोष्टी एकतर पळवल्या, नाहीतर त्यांना स्थगिती दिल्याचा आरोप बंब यांनी मागच्या महाविकास आघाडी सरकारवर केला.

तर आज राज्यातील शेतकऱ्यांची जी दयनीय अवस्था झाली आहे, त्याला वर्षानुवर्ष राज्यावर सत्ता असणारे काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आणि त्यांचे नेते जबाबदार असल्याचा आरोपही बंब यांनी केला. बंब म्हणाले, या राज्यात ५० हजारांहून जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, सगळ्याच सरकाच्या काळात त्या झाल्या. पण या आत्महत्यांचे सर्वाधिक पाप हे आघाडी सरकारचे होते. त्यांनी कोट्यावधी रुपयांच्या शेती व सिंचनासाठीच्या योजना खाल्ल्या, त्यामुळे कधीकाळी शेकडो एकर शेतजमीन बाळगणारा शेतकरी अल्पभूधारक झाला आहे.

जी वाॅटर ग्रीडची योजना सत्तरच्या दशकात व्हायला हवी होती, ती फडणवीसांनी ते मुख्यमंत्री असतांना आणली, समुद्रात वाहून जाणारे पाणी वळवण्याचा प्रयत्न केला, ती योजना देखील मागच्या सरकारने बंद करून टाकली. मराठवाड्यात मंजुर झालेले क्रीडा विद्यापीठ पुण्याच्या बालेवाडीला पळवले, आंतरराष्ट्रीय क्रिडांगण रद्द केले, माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा कारखाना आणि त्याची शेकडो एकर जमीन तुमच्याच नेत्यांनी विकत घेतला, असा आरोप देखील बंब यांनी केला.

भाषणाच्या शेवटी आपल्या मागण्या सरकारकडे मागतांना त्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना देखील टोला लगावला. ते म्हणाले, मी मंजुर करून घेतलेले माझ्या मतदारसंघातील गल्ले बोरगांव येथील मका संशोधन केंद्र दुसरीकडे हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माझी कृषीमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही कुठलीही योजना, प्रकल्प तुमच्या मतदारसंघात घेऊन जावू शकता, न्या, माझी काही हरकत नाही. पण जे मका संशोधन केंद्र मी मंजुर करून घेतलेले आहे, ते कृपया हलवू नका, असेही बंब म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT