Amim Ex corporator Attack News Aurangabad
Amim Ex corporator Attack News Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aimim : माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला ; डोके फुटले, हातही फॅक्चर..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : एमआयएमचे माजी नगरसेवक अब्दुल रहीम उर्फ अज्जू नाईकवाडी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शहरातील चिश्तिया चौकात आज घडली. (Aurangabad) या हल्यात नाईकवाडी यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून हातही फॅक्चर झाला आहे.

त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैयक्तिक वादातून हा हल्ला झाल्याची माहिती. (Aimim) दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. (Marathwada) शहरातील चिश्तीया चौकात अज्जू नाईकवाडी आणि नाशेर शेख यांच्यामध्ये जुन्या वादातून भांडण झाले.

आधी एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर दोघांमध्ये तुबंळ हाणामारी सुरु झाली. यातच नाईकवाडी यांच्यात डोक्यात रॉडने हल्ला करण्यात आल्यामुळे त्यांचे डोके फुटले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती कळताच सिडको पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या हल्ला प्रकरणी नाशेर शेखसह तिघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. या मारहाणीत नाईकवाडी यांच्यात डोक्याला मोठी गंभीर जखम झाली असून, हात देखील फॅक्चर झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT