Prakash Ambedkar, Asaduddin Owaisi Sarkarnama
मराठवाडा

AIMIM-VBA News : इम्तियाज जलील यांच्यासाठी ओवैसी बडेभाई आंबेडकरांना साकडे घालणार?

Prakash Ambedkar - Asaduddin Owaisi News : 'एमआयएम'सोबतची 2019 मध्ये केलेली युती आंबेडकरांनी सहा महिन्यात म्हणजे विधानसभा निवडणुकीला तोडली होती.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : दोन दिवसांपुर्वी संभाजीनगरात येऊन गेलेले वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा आमची आहे, ती कशी सोडणार? असे विधान केले. 'एमआयएम'सोबतची 2019 मध्ये केलेली युती आंबेडकरांनी सहा महिन्यात म्हणजे विधानसभा निवडणुकीला तोडली होती. तेव्हापासून आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांच्यात संवाद झालेला नाही.

खासदार इम्तियाज जलील यांच्याबद्दल तर आंबेडकरांना विशेष राग असल्याचे अनेकदा दिसून आले होते. असे असतांना प्रकाश आंबेडकरांनी इम्तियाज जलील यांना अजूनही आपल्याच पक्षाचे खासदार मानतात हेही नसे थोडके असेच म्हणावे लागेल. एमआयएमसोबतची युती तुटल्यानंतर त्यांना कायम पाण्यात पाहणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी अचानक छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा आमची आहे, ती सोडणार नाही, अशी भूमिका घेत एमआयएमलाही धक्का दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वंचितसोबतची युती तुटल्यामुळे संकटात सापडलेल्या एमआयएमला लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यातरी नवा मित्र मिळालेला नाही. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचेही अजून महाविकास आघाडीसोबत जायचे की नाही? हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्यासाठी राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांचा पर्याय असल्याचे सांगत निर्वाणीचा इशारा दिला होता. संभाजीनगरच्या जागेवर वंचितने दावा सांगितल्यामुळे ते पुन्हा एमआयएमला साथ देतात की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

एमआयएमसाठी प्रकाश आंबेडकरांनी या जागेवर दावा सांगणे हाच मोठा आशेचा किरण ठरला आहे. गेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातून एकमेव खासदार संभाजीनगर मतदारसंघातून निवडून आला होता. या ऐतिहासिक विजयाचा डंका एमआयएमने देशभरात वाजवला होता. पण ज्या वंचितच्या साथीने हा विजय मिळवला होता, आज त्या पक्षाचे `बडेभाई`प्रकाश आंबेडकर यांनी वेगळी भूमिका घेतली आहे.

भाजपला पराभूत करण्यासाठी आपण महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार आहोत. सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने झाल्यातर सोबत, अन्यथा आघाडीतील तीनही पक्षांपैकी जो सोबत येईल त्याच्याशी बोलणी करून आम्ही लोकसभा निवडणुक लढवू, अशा इशारा आंबेडकरांनी याआधीच दिला आहे. परंतु अद्याप महाविकास आघाडीसोबतची वंचितची बोलणी कुठल्याच निर्णयाप्रत आलेली नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT