Marathwada Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट आता चांगलाच सक्रीय झाला आहे. सत्तेत महत्वाची खाती अन् मंत्रीपद मिळवल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बळ देणे सुरू केले आहे. (Nanded NCP New) ज्यांना बंडाला पाठिंबा दिला त्यांना तर निधी दिलाच पण जे कुंपणावर आहे, त्यांनाही निधी देत गळाला लावण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहे. शिवाय ज्या भागात राष्ट्रवादीची ताकद कमी आहे, तिथे सर्वसामान्य कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कुठे ना कुठे समावून घेत त्यांना कामाला लावण्याचे प्रयत्न होतांना दिसत आहेत.
नांदेड (Nanded) जिल्ह्यात कुमकूवत झालेल्या राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी अजित पवार यांनी पक्षाच्या सहा पदाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती दिली आहे. अजित पवारांनी नव्याने नांदेडमध्ये संघटनात्मक बांधणीत लक्ष घातल्याचे यावरून स्पष्ट होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केल्याचे यावरून दिसून येते. राष्ट्रवादी मध्ये फुट पडल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची साथ सोडली नाही.
मोजकेच कार्यकर्ते व पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले. पण या मोजक्या पदाधिकाऱ्यांना बुस्टर देण्याचे काम अजित पवारांनी सहा सदस्यांना जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती देत केले आहे. (NCP) या नियुक्तीत दोन जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. हे सहा सदस्य सरकार नियुक्त विशेष निमंत्रित सदस्य आहेत. जिल्ह्यातील विविध विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा नियोजन व विकास समिती करत असते. या समितीच्या मार्फत निधीचे वाटप करण्यात येते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जिल्हातील विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी ही एक महत्त्वाची समिती असल्याने या समितीवर जाण्याची राजकीय पदाधिकाऱ्यांची धडपड असते. या समितीकडे वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येतो. या समितीवर स्थानिक खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात. या सदस्यांनी सुचवलेल्या कामांना निधी उपलब्ध करून देण्यात यतो. पालकमंत्री हे या समितीचे अध्यक्ष असतात.
राष्ट्रवादी काँग्रेसची नांदेड जिल्ह्यात नाजूक परिस्थिती आहे. यात फुट पडल्याने परिस्थिती अधिकच बिघडली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या पक्षाला नांदेड जिल्ह्यात बळ मिळावे यासाठी सहा पदाधिकार्यांची या समितीवर वर्णी लावली. सरकारने जिल्ह्यातील सहा पदाधिकारी विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त केले आहेत.
यात नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर विश्वंभर पवार, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप धर्माधिकारी, किनवट नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष इसाखान सरदार खान,अरुणा विनायक कदम, धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामचंद्र बन्नाळीकर, राजश्री मनोहर भोसीकर यांचा समावेश आहे.
आम्ही जिल्ह्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न करित आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमची जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करुन काम करण्याची संधी दिली आहे. या संधींचा पक्ष वाढीसाठी उपयोग केला जाईल. दादांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्न करणार, अशी प्रतिक्रिया नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष व नवनियुक्त सदस्य इंजिनिअर विश्वंभर पवार यांनी नियुक्तीनंतर दिली.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.