Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar : बीडमध्ये आठवणींचा बांध फुटला! "कालपर्यंत ज्या गाडीतून अजितदादा फिरायचे, आज त्याच गाडीतून..."!

Ajit Pawar Beed ashes procession news : बीडमध्ये अस्थिकलश यात्रेदरम्यान अजित पवार भावूक झाले. मुंडे, पंडित आणि सोलंके यांनाही आठवणींनी गहिवरले.

Jagdish Pansare

Beed NCP News : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा अस्थिकलश आज बीडमध्ये आणण्यात आला. विशेष म्हणजे बीड दौऱ्यावर अजित पवार जेव्हा यायचे तेव्हा ते ज्या मर्सिडीज कारमधून प्रवास करायचे, त्याच गाडीतून आज त्यांचा अस्थिकलश विसर्जनासाठी नेण्यात आला. या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर आल्याने आमदार धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडीत यांच्यासह सगळेच भावूक झाले.

अजित पवार मराठवाड्यात आले की त्यांचा बीड दौरा ठरलेला असयाचा. या जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेहमची साथ दिली. त्यामुळे त्यांचे बीडकडे कायम लक्ष असयाचे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून अजित पवारांचे या जिल्ह्यातील दौरे वाढले होते.

डीपीसीची बैठक असेल किंवा मग विविध विकास कामांचे लोकार्पण, भुमीपूजन, उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांचा बीड दौरा व्हायचा. गेल्या काही महिन्यात त्यांनी बीड जिल्ह्यातील विकास कामांना गती देत धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरवात केली होती.

बीड दौऱ्यात असताना ते मर्सिडीज कारमधून फिरायचे. आज त्याच गाडीतून अजित पवार यांच्या अस्थिकलशाचा प्रवास झाल्याचे पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते. या कलशातील अस्थींचे गोदावरी नदीत विसर्जन करण्यात आले सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात अस्थि कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.

यावेळी आमदार धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके यांच्यासह माजी आमदारांनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. गोदावरी नदीकाठी असलेल्या शनी मंदिर येथे कलश नेऊन अस्थी विसर्जित करण्यात आल्या. अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती येथे येत असताना विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT