Beed News : राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली. स्पष्टवक्ते आणि कामाने झपाटलेले असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. समोरच्या काय वाटेल याचा विचार न करता स्पष्ट बोलणे हा त्यांचा स्वभाव मला आवडायचा. आता अजित पवारांच्या जाण्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री पद सुनेत्राताईंकडे आले आहे. बीडचे पालकत्वही त्यांनी स्वीकारले आहे, मी त्यांचे स्वागत करते म्हणत मंत्री पंकजा मुंडे यांनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या.
अजित पवार यांच्या अचनाक जाण्याने निर्माण झालेली पोकळी मोठी आहे, ती भरून काढण्यासाठी सुनेत्राताईंना खूप कष्ट घ्यावे लागतील. मी स्वतः या अनुभवातून गेले आहे. गोपीनाथ मुंडे साहेब गेले त्यानंतर माझ्यावर जी जबाबदारी आली ती पार पाडण्यासाठी मलाही खूप कष्ट घ्यावे लागले होते. पण महिला राजकारण असो की कुठलेही क्षेत्र घेतलेली जबाबदारी पार पाडतेच.
सुनेत्राताई या देखील उपमुख्यमंत्री म्हणून आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून योग्य भूमिका पार पाडतील. तसेच अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेले पोकळी त्यांना अपेक्षित काम, विकास साधत भरून काढतील याचा मला पूर्ण विश्वास आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. बीडमध्ये त्यांनी सुनेत्रा पवार यांची पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा दिल्या.
अजित पवार यांच्या स्पष्टवक्तेपणाचे मला नेहमीच कौतुक वाटायचे. मी प्रत्यक्ष भेटीत त्यांना हे अनेकदा बोलले आहे. तेव्हा त्यांनी मलाही सल्ला दिला होता, की एखाद्याला थोड्या वेळासाठी वाईट वाटेल, पण आपली आपल्या नेत्याने फसवणूक केली किंवा दिशाभूल केली असे त्याला अजिबात वाटणार नाही. त्यामुळे काम होणार असेल तर हो सांगायचे, होणार नसेल तर स्पष्ट तोंडावर नाही सांगायचे. त्यांचा हा गुण मला खूप भावला, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसोबत व्यापार करार केल्याबद्दलही पंकजा मुंडे यांनी आनंद व्यक्त केला. गेल्या काही महिन्यापासून अमेरिकेने आपल्यावर मोठा ट्रेड कर लावला होता. पण या काळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थपणे देशाचा कारभार चालवला. अखेर अमेरिकेलाही ट्रेड कराच्या भूमिकेवरून मागे जावे लागले, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.