Durrani-kanhaiya kumar
Durrani-kanhaiya kumar Sarkarnama
मराठवाडा

अजित पवार भेट देईनात, बाबाजानी काॅंग्रेसच्या कन्हैया कुमारला भेटले...

सरकारनामा ब्युरो

परभणी ः राष्ट्रवादी कॉग्रेसचे परभणी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी (Mla Babajani Durrani) यांनी बुधवारी (ता.एक) मुंबई येथे कॉग्रेसचे नेते कन्हैयाकुमार (kanhaiya kumar) यांची भेट घेतली. आमदार दुर्राणी यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवरूनच ही माहिती दिली आहे. (Ncp) या बैठकीत त्यांनी विविध विषयावर प्रदिर्घ चर्चा झाल्याचे म्हटले आहे.

बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. परंतू अद्यापही पक्षाने त्यावर निर्णय दिलेला नाही. सोमवारी (ता.29) जयंत पाटील यांच्यासोबत त्यांची बैठक झाली होती. या बैठकीत नाराज असलेल्या दुर्राणी यांची समजुत काढण्याचा प्रयत्न झाला.

परंतू, जिल्ह्यातील पक्षातंर्गत कलहामुळे आपण वैतागलो असून जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची इच्छा नसल्याचे दुर्राणी यांनी जयंत पाटील यांना स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर त्यांची राष्ट्रवादी कॉग्रेसच्या इतर बड्या नेत्यासोबत बैठक होती. परंतू ती अजूनही झालेली नाही.

एकीकडे दुर्राणी यांनी राजीनामा दिल्यानंतर ते कॉग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होत असली तरी खुद्द दुर्राणी हे आपण पक्ष सोडणार नसल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे त्यांनी बुधवारी (ता.एक) कॉग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांची मुंबईत भेट घेतली आहे.

या बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा झाली असल्याचे खुद्द दुर्राणी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसापासून दुर्राणी हे कॉग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. त्यात त्यांचा मुलगा जुनेद खान दुर्राणी व समर्थकांचा आगोदर कॉग्रेस प्रवेश होईलअसेही सांगितले जाते. परंतू आज दुर्राणी आणि कन्हैया कुमार यांची भेट झाल्याने त्यांच्या काॅंग्रेस प्रवेशाच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT