Ajit Pawar On BRS News Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar On BRS News : ठाकरेंच्या शिवसेना अन् काॅंग्रेसपेक्षा अजित पवारांना बीआरएस-वंचितची धास्ती..

NCP : राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना बीआरएसमध्ये प्रवेश देत केसीआर यांनी मोठा धक्का दिला.

Jagdish Pansare

Maharashtra : राष्ट्रवादीत बंड करून पस्तीस आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्तेत जाऊन बसलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण आज राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. (Ajit Pawar On BRS News) कार्यकर्त्यांना उद्देशून तासभर केलेल्या भाषणातून अजित पवारांनी अनेक गौप्यस्फोट आणि गोष्टींचा उलगडा केला. त्यांच्या भाषणातून २०१४ ते आजतागायत पडद्यामागे घडलेल्या अनेक घडामोडी राज्याच्या जनतेसमोर आल्या.

बंड करून सत्तेत सहभागी झाल्यानंतर भविष्यात समोर असलेल्या आव्हानांबद्दलही त्यांनी समर्थक आमदार, व्यासपीठावर बसलेले नेते आणि उपस्थितीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाही सावध केले. (Ajit Pawar) महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलथापालथ आणि घडामोडी घडत असतांना बीआरएस (K.Chandrashekar Rao) पक्षाने केलेली एन्ट्री आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद यांची जाणीव अजित पवारांनी करून दिली.

महाविकास आघाडीत ज्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आणि काॅंग्रेससोबत अडीच वर्ष सत्ता उपभोगली त्या दोन्ही पक्षांचे आव्हान आपल्यासमोर नाही, पण बीआरएस आणि वंचित बहुजन आघाडीकडे (VBA) दुर्लक्षित करून चालणार नाही, असे त्यांनी भाषणातून सांगितले. बीआरएस आणि वंचित हे दोन्ही पक्ष एकत्र येवून महाराष्ट्रात पुढील काळात राजकारण करण्याची शक्यता असल्याचा दावा देखील अजित पवारांनी केला.

या उलट शिवसेना (ठाकरे गट) आणि काॅंग्रेस एकत्र राहतील की नाही? याबद्दल शंका उपस्थितीत करत आपल्यालेखी या पक्षांना महत्व नसल्याचे अजित पवारांनी सांगण्याचा प्रयत्न केला. सहा महिन्यांपुर्वी नांदेड मार्गे महाराष्ट्रात दाखल झालेल्या तेलंगणातील केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीने धुमाकुळ घातला आहे. छोट्या मोठ्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांना पक्षात घेवून नांदेड, छत्रपती संभाजीनगरात हजारोंचे मेळावे घेत बीआरएसने पस्थापित पक्षांना धोक्याचा इशारा दिला.

पंढरपूरच्या वारीत वारकऱ्यांवर पृष्पवृष्टी आणि पांडुरंगाचे दर्शन घेत जी वातावरण निर्मिती केसीआर आणि त्यांच्या पक्षाने राज्यात केली, त्याकडे लोक आकर्षित होत आहेत. शेतकऱ्यांसाठी तेलंगणा माॅडेल राबवण्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांचा या पक्षाला मोठा प्रतिसाद मिळतांना दिसतो आहे. राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना बीआरएसमध्ये प्रवेश देत केसीआर यांनी मोठा धक्का दिला. बीआरएस आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याच्या हालचाली देखील सुरू आहेत. याचा आवर्जून उल्लेख करत अजित पवारांनी या पक्षाला गांभीर्याने घेण्याच्या सूचनाच कार्यकर्त्यांना दिल्याचे यावेळी दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT