Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde: अजितदादांची साथ अतुल बेनके सोडणार का? धनंजय मुंडे म्हणतात...

Ajit Pawar Group Atul Benke Met Sharad Pawar:विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 42 आमदार असताना 49 मते झाली. त्यामुळे ही सात मते कोणाचे आहेत ? हे सांगायची आवश्यकता नाही, असे सूचक विधान धनंजय मुंडे यांनी केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

शरद पवार अन् अजित पवार एकत्र येऊ शकतात, असं विधान राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील आमदार अतुल बेनकेंनी केले आहे. त्यानंतर ते शरद पवार यांची साथ सोडणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. बेनके यांच्या वक्तव्यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 42 आमदार असताना 49 मते झाली. त्यामुळे ही सात मते कोणाचे आहेत ? हे सांगायची आवश्यकता नाही, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते, मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. अतुल बेनके यांच्या विधानावर उत्तर देताना ते म्हणाले, "शरद पवारसाहेब आणि बेनके यांचे वडील वल्लभ बेनके यांचे काय संबंध आहेत ? हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे,"

जुन्नरचे आमदार आणि सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असलेल्या अतुल बेनके यांनी काल (शनिवारी) सकाळी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काही काळ त्यांच्याशी संवादही साधला. अजित पवार गटाचे आमदार पुन्हा शरद पवार गटात परतत आहेत का? अशी चर्चा सुरू झाली.

बेनके ही अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का? अशी चर्चा रंगलेली आहे. खासदार अमोल कोल्हेच्या घरी ही भेट घडली, याला शरद पवारांनी ही दुजोरा दिलेला आहे. ते आत्ता कोणत्या पक्षात आहेत? मला ते अजित पवार गटात आहेत, याची मला कल्पना नाही. तो माझ्या मित्राचा मुलगा आहे, त्यामुळं यावर फार चर्चा नको, असे म्हणत शरद पवारांनी अतुल बेनके यांच्या पक्ष प्रवेशावर सूतोवाच केले.

पवार-बेनके यांच्या भेटीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, "यात नवीन काय? लोक भेटायला येत असतात. अतुलचे वडील माझे मित्र आहे. माझ्या मित्राचा तो मुलगा आहे. राजकारणाचा निर्णय त्या त्या वेळेस घेऊ." मात्र यानंतर काही तासातच पुण्यातील पत्रकार परिषदेला बोलताना कोण अतुल बेनके? असा प्रश्न पवारांनी विचारला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT