Ajit Pawar Poster News Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar Poster News : अजित पवारांच्या सासरवाडीतही झळकले `भावी मुख्यमंत्री` चे पोस्टर..

Marathwada : मध्यंतरी ते भाजपबरोबर जातील अशी अटकळ बांधली जात होती.

सरकारनामा ब्युरो

Osmanabad : जिल्ह्यातील तेर गावचे जावई असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सासरवाडीमध्ये `भावी मुख्यमंत्री` असे फलक लावण्यात आले आहेत. (Osmanabad District) येथील राष्ट्रवादीचे युवानेते पृथ्वीराज आंधळे यानी हे बॅनर लावले असून संत गोरोबा काकांच्या मंदीरात दुग्धाभिषेक करुन अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी साकडे देखील घातले आहे.

त्यामुळे पुन्हा अजित पवारांच्या (Ajit Pawar) मुख्यमंत्री पदाची चर्चा सूरु झाली आहे. त्यातच आजपासुन तीन दिवस मुख्यमंत्री रजेवर गेल्याची चर्चा देखील राज्यभरात होतांना दिसते आहे. (Ncp) जिल्ह्यातील तेर गावच्या पाटील घराण्यातील कन्या सुनेत्रा यांच्याशी अजित पवार यांचा विवाह झाला असुन ते तेरचे म्हणजे जिल्ह्याचे जावई आहेत.

अनेक लहान मोठ्या समारंभासाठी किंवा दुःखद घटनेच्या प्रसंगी अजित पवार येथे येत असतात. (Marathwada) त्यांचे तेरशी अत्यंत घनिष्ट संबध असुन तेरवासीयांनाही आपल्या जावयावर अभिमान असल्याचे अनेकदा दिसुन आले आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा आला असुन अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करताच तेर गावात भावी मुख्यमंत्री म्हणुन अजित पवार यांचे बॅनर झळकु लागले आहेत.

मंदीरामध्ये अभिषेक घालुन साकडे घातले जात आहे, या घटनेची चर्चा जिल्ह्यासह राज्यभरात होत आहे. सध्या राज्यातील अस्थिर परिस्थिती पाहता कधीही काहीही होऊ शकते असे बोलले जाऊ लागले आहे. त्यात अजित पवारांचीच सर्वाधिक चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे.

मध्यंतरी ते भाजपबरोबर जातील अशी अटकळ बांधली जात होती मात्र त्याला त्यांनी ठाम नकार देत चर्चा फक्त अफवा असल्याचे ठासून सांगितले होते. तसेच आपल्याला आताही मुख्यमंत्री व्हायला आवडेल अशी जाहीर इच्छा देखील बोलून दाखवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT