Damodar Mavjo
Damodar Mavjo sarkarnama
मराठवाडा

सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीला साहित्यिक गपगुमान प्रोत्साहन देतात ; मावजो यांची खंत

सरकारनामा ब्युरो

लातूर : ''सत्तेचा माज चढला की निर्बंध लादले जातात.अशा वेळी साहित्यिक गप्प का बसतात? असा सवाल ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरीकार दामोदर मावजो (Damodar Mavjo)यांनी उपस्थित केला. उदगीर येथील ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Udgir) प्रमुख पाहुणे म्हणून मावजो बोलत होते.

''एखादं पुस्तक पसंत नाही म्हणून जाळून टाकणं, बंदी आणणं योग्य नाही. आज साहित्यिकांमध्ये चिअर लीडर्स तयार झालेत.ते सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीला गपगुमान प्रोत्साहन देतात,'' असे मावजो म्हणाले. मावजो यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परखड मत व्यक्त केले.

दामोदर मावजो म्हणाले, ''पुस्तकावरील बंदी रास्त होती का ? माझ्या एका मित्राचे पुस्तक जाळूला टाकलं गेलं. एखादं पुस्तक पसंत नाही म्हणून जाळून टाकणं, बंदी आणणं योग्य नाही. साहित्य प्रफुल्लित ठेवायचं असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवलं पाहिजे,''

''जेव्हा सत्तेला माज चढतो तेव्हा निर्बंध लादले जातात.एकाधिकारशाही बळकट करताना फॅसिझमला खतपाणी मिळतं. अशावेळी साहित्यकार हात बांधून शांत बसू शकतात का?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

लातूर येथील उदगीर नगरीत ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारी सरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उदघाटन झाले आहे. यावेळी पवार यांनी साहित्य आणि राजकारणावर विशेष भाष्य केलं.

पवार म्हणाले "राज्यकर्ते थेट प्रोपोगंडा करत नाही. यासाठी राज्यकर्त्यांनी कॉर्पोरेट जगताची मदत घेतली आहे. चित्रपट श्रेत्रात तर अशा प्रोपोगंडाची थेट एंट्री झालीय. साहित्यात सुद्धा कॉर्पोरेटीकरण झाले आहे. तोट्यात असलेल्या प्रकाशन संस्था ताब्यात घेतल्या की, चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही"

''साहित्याची ताकद खऱ्या अर्थाने फ्रेंच राज्यक्रांतीवेळी दिसून आली. फ्रेंच राज्यक्रांतीमुळे जगाला समजले की, लेखणी ही क्रांतीची मशाल होऊ शकते. रूसो, व्हॉल्टेअर यांच्या तत्वज्ञानाने क्रांतीचा परिपोष केला, सामान्यांनी वर्गव्यवस्था लाथाडली आणि सोळाव्या लुईची जुलमी राजवट उलथवली. यावरून एक बोध घेता येतो की, हस्तिदंती मनोऱ्यातील साहित्यात सामर्थ्य नसते तर ते समाजाभिमुख असले तरच त्यात शक्ती येते,'' असे पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT